Tarun Bharat

कारागृहात मोबाईलचा वापर, मोक्कातील तिघांना अटक

Advertisements

प्रतिनिधी / कोल्हापूर

झडती प्रक्रियेवेळी कळंबा कारागृहाच्या अतिसुरक्षा विभागात 1 मोबाईल आणि 4 बॅटऱया कारागृहाच्या  26 डिसेंबर रोजी आढळल्या होत्या. या प्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी मोक्का अंतर्गत बंदी असलेल्या तिघांना सोमवारी उशिरा अटक केली. अभिमान विठ्ठल माने (वक 40 रा. सुभाषनगर टाकळी ता. मिरज जि. सांगली), शुक्रराज पांडुरंग घाडगे (वय 35 रा. तुपारी ता. पलुस जि. सांगली), युवराज उर्फ अभि मोहनराव महाडीक (वय 36 रा. बी वॉर्ड, मंगळवार पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. 

  कळंबा कारागृहामध्ये 10 मोबाईल, पेन ड्राईव्ह, चार्जर फेकल्याच्या घटनेनंतर कारागृह प्रशासन हादरले होते. यानंतर अवघ्या चारच दिवसांत कारागृहाच्या अतिसुरक्षा विभागात आणखी 1 मोबाईल, 4 बॅटऱया आढळल्याने खळबळ उडाली होती. शुक्रवार (26 डिसेंबर) रोजी कारागृहाच्या झडतीवेळी झडतीवेळी हा प्रकार उघडकीस आला होत. या प्रकरणी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

   जुना राजवाडा पोलीसांच्या चौकशीमध्ये अभिमान माने, शुक्रराज घाडगे, युवराज उर्फ अभि महाडीक यांची नावे तपासात निष्पन्न झाली. मोका अंतर्गत बंदी असणारे तिघे जण कारागृहाच्या अतिसुरक्षा विभागात होते. या तिघांनीच कारागृहात मोबाईलचा वापर केल्याचे समोर आले. यानुसार पोलीसांनी सोमवारी या तिघांना अटक केली. दरम्यान या तिघांनी कारागृहात मोबाईलचा वापर कशासाठी केला. कारागृहातून कोणाकोणाशी संपर्क साधला याचा शोध पोलीस घेत आहेत. या प्रकरणात आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे. पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप जाधव यांनी तपास करत आहेत.

Related Stories

उसने पैसे घेतलेल्या मानसिक तणावातून महिलेचा हृदयविकाराने मृत्यू; पोलिसात गुन्हा दाखल

Abhijeet Khandekar

कोल्हापूर : महापौर निलोफर आजरेकरांना मुदतवाढ

Archana Banage

हुपरी नगरपरिषदमध्ये कोरोनाचा शिरकाव

Archana Banage

कोल्हापूर बोर्ड सहसचिवपदी डी.एस.पोवार यांची नियुक्ती

Abhijeet Khandekar

स्थानिकांना रोजगारासाठी सहकार्य करा

Archana Banage

बोरपाडळे येथील चोरी पाच दिवसात उघड

Archana Banage
error: Content is protected !!