Tarun Bharat

कार्तिकी वारी निर्बंधातच,दिंड्यांना पंढरपूरकडे जाण्यास मज्जाव

Advertisements

पंढरपूर / प्रतिनिधी


पंढरपूरची कार्तिकी यात्रा 26 नोव्हेंबर रोजी होत आहे. या यात्रेसाठी संपूर्ण राज्यातून पंढरपूरकडे दिंड्या जात असतात. यंदाच्या वर्षी राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांना शासनाने पंढरपूरकडे दिंड्या पाठवू नकात. असा आदेश नुकताच पारित केला आहे. विशेष म्हणजे कार्तिकी एकादशी दिवशीचे विठोबाचे नित्योपचार देखील सीमित मान्यवरांच्या उपस्थित होतील. असेही या आदेशात नमूद केल्याने यंदाची कार्तिकी वारी निर्बंधातच होईल. हे निश्चित होत आहे.

कार्तिकी यात्रेसाठी महाराष्ट्र राज्याच्या सर्व जिल्ह्यातून पायी दिंड्या पंढरपूरकडे येत असतात. यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी आपल्या जिल्ह्यातून पंढरपूरकडे दिंड्यांना जाऊ देऊ नये. अशा आशयाचे आदेश राज्य शासनाच्यावतीने पाठवण्यात आले आहेत. त्यामुळे आषाढी नंतर कार्तिकीवरही निर्बंध आल्याचे दिसून येत आहे.

पंढरपुरात निर्मनुष्य आषाढी प्रमाणे येणारी कार्तिक वारी संपन्न व्हावी. वारीमध्ये संचारबंदी असावी. असा प्रस्ताव सोलापूर जिल्हा प्रशासनाच्यावतीने राज्य शासनाला पाठविण्यात आला आहे. याबाबत अद्याप जरी निर्णय झाला नसला, तरी राज्य शासनाने इतर जिल्ह्यांना आपल्या जिल्ह्यातून पंढरपकडे जाणाऱ्या दिंड्या पाठवण्यात केलेला मज्जाव पाहता. आषाढी प्रमाणेच कार्तिकी वारी ही निर्बंधातच होण्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे.

Related Stories

मंकीपॉक्सची दहशत, राज्य सरकारकडून मार्गदर्शक तत्वे जारी

datta jadhav

पंचनाम्यापासून एकही बाधित कुटूंब वंचित राहू नये

Patil_p

पिस्टलसह गावटी कट्टा हस्तगत

Patil_p

सोलापूर : बार्शीत कोरोना रुग्णांची बिल तपासण्यासाठी ‘ऑडिटर’ पथक कार्यान्वित

Archana Banage

जन्मदात्या मुलानेच मित्रांच्या मदतीने केला बापाचा खून

Archana Banage

यवतमाळ : दारूची तल्लफ भागवण्यासाठी सॅनिटायझरचे प्राशन; 7 जणांचा मृत्यू

Tousif Mujawar
error: Content is protected !!