Tarun Bharat

कार्तिक वारीही प्रतिकात्मकरित्या साजरी करा

वारीला कोरोना महामारीचा बेक, वारकऱयांतून नाराजी, दिंडीची परंपरा खंडित, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाचा निर्णय

सुनील राजगोळकर / बेळगाव 

भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढपूरच्या विठुरायाच्या कार्तिक वारीसाठी महाराष्ट्रसह देशभरातून 12 लाखाहून अधिक भाविक एकवटतात. मात्र प्रशासनाने कार्तिक एकादशीला वारकरी व दिंडय़ांना पंढरपुरात प्रवेश बंदी घातली आहे. त्यामुळे आषाढीनंतर भरणाऱया या मोठय़ा यात्रेला कोरोनाचा बेक लागला आहे. गुरुवारी हेणाऱया कार्तिक एकादशीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. तसेच खबरदारी म्हणून आषाढी एकादशीप्रमाणेच कार्तिकी यात्रा देखील प्रतिकात्मक रुपात साजरी करण्याचे आवाहन केले आहे.

 महाराष्ट्रात सर्वात मोठी यात्रा म्हणून ओळखली जाणारी आषाढी वारी देखील खंडित झाली होती. दरम्यान, अनेक दिंडय़ा थांबल्या होत्या. कार्तिक वारीसाठी महाराष्ट्रसह कर्नाटक, आंध्रप्रदेश व अन्य राज्यांतून शेकडोंच्या संख्येने दिंडय़ा आणि पालख्या पंढरपुरात दाखल होतात. याबरोबरच बेळगाव जिल्हय़ातूनही कार्तिक वारीला पंढरपूरकडे दिंडय़ाबरोबरच दर्शनासाठी जाणाऱया वारकऱयांची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे. मात्र महाराष्ट्र शासनाने सर्व सोहळय़ांना बंदी घातल्याने इतिहासात प्रथमच वारकऱयांना कार्तिक वारीपासून दूर रहावे लागले आहे.

पंढरपुरात संचारबंदी

गेल्या काही दिवसांपासून काही बाबतीत शिथिलता देण्यात आली आहे. दिवाळी पाडव्याच्यादिवशी खबरदारी घेऊन व सुरक्षित अंतर ठेवून मुखदर्शन सुरू होते. मात्र आता मुखदर्शन देखील बंद ठेवले आहे. दरम्यान कार्तिक एकादशीला परवानगी मिळेल, अशी आशा असणाऱया भाविकांचा हिरमोड झाला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन सोलापूरचे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांनी पंढरपुरात संचारबंदी लागू केली आहे. कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरकडे येऊ नये, असा आदेश दिला आहे. त्याबरोबर पंढरपूर आणि परिसरातील 8 ते 10 गावांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे पंढरपूरच्याजवळ देखील जाता येणार नाही. कोरोनामुळे यापूर्वीची आषाढी वारी चुकलेल्या वारकऱयांना कार्तिक वारीत सहभागी होता येईल, अशी अशा होती. मात्र प्रशासनाने कार्तिक वारीसाठी देखील पंढरपुरात प्रवेशबंदी घातल्याने यावषीच्या कार्तिक वारीला मुकावे लागले आहे.

वारकरी मंडळींतून नाराजी

सध्या सुरू असलेले सुगी हंगाम वेळेत संपवून कार्तिक एकादशी वारीला जाण्यासाठी तालुक्मयातील वारकरी मंडळींची तयारी सुरू होती मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे वारीवर बंदी आणल्याने वारकरी मंडळींतून नाराजी व्यक्त होत आहे. या यात्रेसाठी दरवषी विविध ठिकाणाहून निघणाऱया पायी दिंडय़ा मार्गस्थ होत होत्या. मात्र कोरोनामुळे यंदा सर्वच दिंडय़ांना स्थगिती मिळाली आहे. अलिकडच्या काही वर्षात दिंडय़ांची संख्या वाढली होती. मात्र यंदा कोरोनामुळे वारीतील दिंडीची परंपरा खंडित झाली आहे.    

कोरोनामुळे दिंडय़ा रद्द

 कार्तिक वारीसाठी ग्रामीण भागातील कडोली, नावगे, किणये, कर्ले यासह चंदगड तालुक्मयातून दिंडय़ा पंढरपूरकडे जात होत्या. या दिंडय़ांतून टाळ, मृदंगासह शेकडो वारकरी स्वेच्छेने सहभागी होत होते. मात्र कोरोनामुळे दिंडय़ा रद्द झाल्याने दिंडी प्रमुखांसह वारकऱयांना दिंडीपासून दूर रहावे लागले आहे.

गावांमधील मंदिरांतून कार्तिक वारी साजरी करावी

 गेल्या 30 वर्षांपासून अखंडपणे वारी करत आहे. मात्र कोरोनामुळे कार्तिक वारीपासून दूर रहावे लागले आहे. आषाढी वारीला देखील कोरोनामुळे विठुरायाचे दर्शन घेता आले नव्हते. त्यामुळे कार्तिक वारीवर आशा होती. मात्र कार्तिक वारीलाही कोरोनामुळे जाता येणार नसल्याने दुःख वाटत आहे. सर्व वारकऱयांनी गावांमधील मंदिरातून सामाजिक अंतर पाळून कार्तिक वारी साजरी करावी, शासनाने घातलेल्या नियमांचे पालन करून गावा-गावांमध्ये साधेपणाने जागर कीर्तन व कालाकीर्तन करून हा सोहळा साजरा करावा.

 ह.भ.प. परशराम कनगुटकर (वारकरी परिषद तालुका अध्यक्ष, बेळगाव)

कोरोनाचे संकट लवकर दूर होऊ दे !

 गेल्या पंधरा वर्षांपासून कार्तिक वारी करतो, मात्र यंदा पहिल्यांदाचा कोरोनामुळे पंढरपूरला जाता येणार नाही, याची खंत वाटते. तसेच कोरोनामुळे वारकरी संप्रदायाच्या सर्व कार्यक्रमांवर मर्यादा आल्याने असमाधान वाटत आहे. कोरोनाचे संकट लवकरात लवकर दूर होऊन विठुरायाचे दर्शन व्हावे, हीच इच्छा मनात आहे

.ह.भ.प. बळवंत हुंदे

Related Stories

जुन्या तहसीलदार कार्यालयात अस्वच्छता

Amit Kulkarni

कंग्राळी, गौंडवाड परिसरात पारंपरिक पद्धतीने एकादशी साजरी

Amit Kulkarni

बागलकोट-कुडची रेल्वे महामार्गासाठी जमिनीचे संपादन पूर्ण करा

Patil_p

सौंदत्ती येथील रेणुका मंदिर 28 पासून भक्तांसाठी खुले

Amit Kulkarni

‘त्या’ शिवप्रेमींना न्यायालयाकडून जामीन

Amit Kulkarni

कर्नाटक राज्यपालांनी सिद्धरामय्या यांना लिहले पत्र

Archana Banage