Tarun Bharat

भाजप – जेडीएस एकाच नाण्याच्या दोन बाजू

Advertisements

बेंगळूर/प्रतिनिधी

विधानपरिषदेत शेतकरी विरोधी जमीन सुधार विधेयकाला पाठिंबा देऊन जनता दल-एस ने हे सिद्ध केले की भाजपा आणि जेडी-एस एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, असे वक्तव्य माजी कॉंग्रेस नेते कृष्ण बेरे गौडा यांनी केले.

देवनहळ्ळी तहसीलमध्ये सुरु असणाऱ्या पंचायत निवडणुकीपूर्वी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना, जद-एसला हवे असेल तर विधानसभेतील मतांचे विभाजन करून हे विधेयक नाकारले जाऊ शकते. पण हे शेतकरीविरोधी विधेयक मंजूर करण्यात भाजपला मदत करून जेडी-एसने शेशेतकऱ्यांची फसवणूक केली आहे.

पंचायत निवडणुकीत जेडी-एसला धडा शिकवायचा असेल तर शेतकऱ्यांना या घोटाळ्याची योग्य माहिती द्यावी लागेल. दरम्यान कॉर्पोरेट क्षेत्रांना मदत करण्यासाठी केंद्र व राज्य सरकार विविध सेवांचे खासगीकरण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. या धोरणांतर्गत राज्यातील वीज वितरण कंपन्यांचे खासगीकरण करण्याचे प्रस्तावित आहे.

सरकरने सर्वोच्च न्यायालयात मागितली दाद
बृह बेंगळूर महानगरपालिका (बीबीएमपी) निवडणुका घेण्याच्या उच्च न्यायालयाच्या आदेशाला राज्य सरकारने आव्हान दिले आहे. बीबीएमपीसाठी नवीन कायदे जारी करण्यासाठी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या मान्यतेबद्दल सरकारने सर्वोच्च न्यायालयात माहिती दिली आहे. नवीन कायद्यांतर्गत निवडणुका घेण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयावर स्थगिती देण्याचे सरकारने आवाहन केले आहे.

Related Stories

कर्नाटक: खासदार अनंतकुमार हेगडे कोरोना पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde

लसीकरण मोहिमेचा संपूर्ण खर्च केंद्र सरकारने करावा: शिवकुमार

Abhijeet Shinde

प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी 14 जणांना अटक

Amit Kulkarni

जगप्रसिद्ध जोग फॉल्स पर्यटकांसाठी मुक्त

Amit Kulkarni

दोन अपघातात तीन ठार

Amit Kulkarni

कर्नाटक: १६ जानेवारीच्या लसीकरणादरम्यान स्वच्छता कर्मचाऱ्यांना प्रथम लस मिळणार

Abhijeet Shinde
error: Content is protected !!