Tarun Bharat

कार्यकर्त्यांवरील राजदोहाचा गुन्हा मागे घ्या

माजी नगरसेवक संघटनेचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन : आरोपींचा शोध घेण्याची मागणी

प्रतिनिधी /बेळगाव

बेळगाव शहरासह कर्नाटकमध्ये महापुरुषांचा अवमान करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ही बाब अत्यंत गंभीर आहे. छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा या महापुरुषांच्या पुतळय़ांचा अवमान करण्यात आला. त्यानंतर आंदोलने झाली. त्याचे पडसाद उमटले. मात्र हे आंदोलन करताना निष्पाप तरुणांना अटक करण्यात आली. ज्यांनी कोरोनाकाळात रात्रंदिवस काम केले त्यांच्यावरच राजद्रोहासारखा गुन्हा दाखल करण्यात आला. ही बाब अत्यंत गंभीर आहे. तेव्हा अशा सेवा करणाऱया तरुणांची तातडीने सुटका करावी, अशी मागणी माजी नगरसेवक संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

राजद्रोहासारखा गुन्हा या निष्पाप तरुणांवर दाखल करण्यात आला आहे. ज्यांनी कोरोनाकाळात अनेकांचे जीव वाचविले. त्यांच्यावर असा गुन्हा घालणे ही बाब अत्यंत चुकीचे आहे.

म. ए. समितीचे युवा अध्यक्ष शुभम शेळके, हिंदू संघटनांचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांच्यासह 38 जणांवर गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. खरे गुन्हेगार मोकाट आहेत. ज्यांनी गुन्हा केला त्यांचा शोध घ्या आणि त्यांच्यावर कारवाई करा. मात्र निष्पापांवर गुन्हे दाखल करणे योग्य नाही. तेव्हा याचा पुनर्विचार करावा आणि तातडीने राजद्रोहाचा गुन्हा मागे घ्यावा, अशी मागणी करण्यात आली.

शिरस्तेदार मंजुनाथ जानकी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी माजी महापौर आणि ऍड. नागेश सातेरी, माजी महापौर शिवाजी सुंठकर, माजी महापौर किरण सायनाक, माजी महापौर मालोजी अष्टेकर, माजी उपमहापौर संजय शिंदे, माजी नगरसेवक मनोहर हलगेकर, विनायक गुंजटकर, आर. एस. बिर्जे, प्रशांत भातकांडे, दिनेश रावळ, सुधा भातकांडे, आर. आय. पाटील, भोसले, आर. एन. हुलजी यांच्यासह इतर माजी नगरसेवक उपस्थित होते.

Related Stories

आरएसएसकडून देशप्रेम वाढविण्याचे काम

Patil_p

होळीनिमित्त खासबागमध्ये आकर्षक आरास

Amit Kulkarni

किल्ला परिसरात वाहतुकीची कोंडी

Patil_p

तालुक्यातील अनेक तलावांमध्ये जलपर्णी आणि गाळ

Patil_p

6 फुटी मगर पकडून केली थरारक मोहिम फत्ते…

Rohit Salunke

स्मार्ट सिटीतील पथदीप सुरू करण्यासाठी वायरचा आधार

Patil_p