Tarun Bharat

कार्यालयाजवळील ड्रेनेज समस्या सोडविण्यास मनपा अपयशी

परिसरात दुर्गंधी पसरल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात

प्रतिनिधी / बेळगाव

शहरातील डेनेज समस्या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. विविध ठिकाणी तुंबणाऱया डेनेजमुळे चेंबरमधून सतत वाहणारे सांडपाणी आणि त्यामुळे नागरिकांना निर्माण होणाऱया समस्या सोडविण्यात महापालिका प्रशासनाला सपशेल अपयश आले आहे. सुभाषनगर येथील महापालिका कार्यालयालगतच निर्माण झालेली डेनेजची समस्या सोडविण्याकडे आरोग्य विभागाने दुर्लक्ष केले असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

महापालिका कार्यालयापासून जवळच असलेल्या मराठा मंडळ पॉलिटेक्निक कॉलेज रोडवरील ड्रेनेज चेंबर तुंबले असून गेल्या कित्येक महिन्यांपासून सांडपाणी वाहत आहे. याबाबत महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे तक्रार करूनही याची दखल पर्यावरण अधिकारी घेत नसल्याची तक्रार नागरिक करीत आहेत. या ठिकाणी चेंबर तुंबण्याचा प्रकार वारंवार होत असून ही समस्या कायमस्वरुपी सोडविण्याकडे पर्यावरण अधिकाऱयांनी कानाडोळा केला असल्याची टीका नागरिक करीत आहेत. यापूर्वी दोन वेळा या ठिकाणी ही समस्या निर्माण झाली होती. तात्पुरती उपाययोजना करून समस्या सोडविण्यात आली होती. मुख्य रस्त्यावर असलेल्या चेंबरमधून सांडपाणी वाहत होते. मात्र आता मराठा मंडळ पॉलिटेक्निककडे जाणाऱया रस्त्यावरील डेनेज तुंबले आहे. चेंबरमधून मोठय़ा प्रमाणात सांडपाणी वाहत असून सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. रस्त्यावरून वाहणारे सांडपाणी वाहनधारक आणि पादचाऱयांच्या अंगावर उडत आहे. परिणामी नागरिकांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. या परिसरात मेस व कॅन्टीन असल्याने विद्यार्थीवर्ग मोठय़ा प्रमाणात ये-जा करीत असतात. पण परिसरात दुर्गंधी पसरल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मनपा अधिकाऱयांच्या बेजबाबदारपणाबद्दल नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. महापालिकेचे पर्यावरण अधिकारी याकडे लक्ष देतील का, अशी विचारणा नागरिक करीत आहेत.

Related Stories

यळेबैल दुर्गामाता मंदिराचा चौकटपूजन सोहळा उत्साहात

Amit Kulkarni

आश्वासनानंतर शेतकऱयांचे आंदोलन मागे

Omkar B

हलगा-मच्छे बायपासप्रकरणी पंतप्रधानांचे राज्य सचिवांना पत्र

Amit Kulkarni

पथदीपांचा निधी गेला कुठे?

Amit Kulkarni

हुतात्मादिन सर्वत्र गांभीर्याने

Patil_p

वृद्धांची काळजी घेण्यात कर्नाटक सरकार असमर्थ

Patil_p