Tarun Bharat

कार्लुस यांनी काढली विजयाची रॅली

प्रतिनिधी /म्हापसा

हळदोणा मतदारसंघात 10 वर्षानंतर काँग्रेसचा उमेदवार निवडून आल्यामुळे या वाठारात आनंद व्यक्त होत आहे. गेली 10 वर्षे या वाठाराचा हवा तसा विकास झाला नव्हता. त्यामुळे त्या वाठारातील जनता त्या आमदारावर नाराज होती. पंरतु ते उघडपणे बोलून दाखवित नव्हते. शेवटी फेब्रुवारी 14 हा दिवस त्या लोकांना आपला राग दाखविण्यासाठी आला व या भागातील लोकांनी भाजपच्या त्या आमदाराविरोधात मतदान करून आपला राग मतपेटीत बंद केला. व 10 मार्च रोजी त्याचा उद्रेक झाला.

भाजपच्या त्या आमदाराचा पराभव झाला. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नव्हे तर इतर विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंद दिसून आला. या भागात अनेक समस्या आहे. पोंबुर्फा येथील हिंदू स्मशानभूमीचा रस्ता, पोंबुफ्याची झर, या पंचायत भागातील वॉर्ड प्रभागातील रस्ते, इतर अनेक समस्या या पंचायत वाठारात आहे. परंतु गेली 10 वर्षे याकडे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे. तेव्हा आता या मतदारसंघात काँग्रेसचे ऍड. कार्लुस यांच्या रुपाने एक नवीन ज्योत या मतदारसंघात लावली आहे. तेव्हा तिचा उजेड संपूर्ण मतदारसंघात पडो अशी लोकांची इच्छा आहे.

Related Stories

दौऱयांचे हिशेब सादर न केलेल्या माजी नगरसेवकांना पुन्हा नोटिसा

Amit Kulkarni

गोव्यातील आगामी सरकार ‘आप’चेच

Amit Kulkarni

एसआयटीकडून भू-माफियाला अटक

Patil_p

पणजी सहा पालिकांची रणधुमाळी आज संपणार

Amit Kulkarni

राज्यात कोरोनाची दहशत कायम

Patil_p

मावळलेल्या नगरसेवकांबरोबर अनेक इच्छुकांचे पत्ते कट

Amit Kulkarni