Tarun Bharat

कार-कंटेनरच्या भीषण अपघातात 5 ठार

ऑनलाईन टीम / लोणावळा :

मावळ तालुक्यातील जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर शिलाटणे गावाजवळ कार आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून, कारचा चक्काचूर झाला आहे. आज सकाळी ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर शिलाटणे गावाजवळ मुंबईहून पुण्याच्या दिशेने येणारी फोर्ड कार दुभाजक ओलांडून पुण्याकडून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या कंटनेरवर आदळल्याने हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच महाराष्ट्र सुरक्षा बल, आयआरबी पेट्रोलिंग, पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत कंटेनरखाली अडकलेली गाडी आणि मृत प्रवाशी यांना बाहेर काढले. चालकाचा ताबा सुटल्यामुळे हा अपघात झाला असून, अपघातात कारमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून, कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. अपघातातील मृत हे मीरा भाईंदर येथील एकाच परिवारातील असल्याची माहिती मिळत आहे.

Related Stories

शहरात स्वच्छता… प्रवेशद्वारावर अस्वच्छता

Patil_p

सोलापुरात रविवार वगळता सर्व दुकाने उद्यापासुन सुरु

Archana Banage

महाराष्ट्रात चिंताजनक परिस्थिती! कोरोना रुग्ण संख्या 32.29 लाख पार

Tousif Mujawar

विनापरवाना पिस्तुल, अंमलीपदार्थप्रकरणी तिघांना अटक

Abhijeet Khandekar

आता ‘स्पुटनिक व्ही’ लस देखील सरकार देणार मोफत; असा आहे प्लॅन

Tousif Mujawar

माजी केंद्रीय कायदेमंत्री अश्विनी कुमार यांचा काँग्रेसला रामराम

datta jadhav