Tarun Bharat

कार खरेदी फसवणूक प्रकरणी सद्दाम जमादार यास अटक

उचगाव / वार्ताहर

इनोवा कार खरीदी देतो असे सांगून केदार दिलीप ढोणे(वय३३.रा.लोणार वसाहत कोल्हापूर ) यांच्याकडून 3 लाख ८८००० रुपये घेतले मात्र चारचाकी गाडी दिली नाही म्हणून फसवणूक केल्या प्रकरणी सद्दाम खुदबुद्दीन जमादार यास दुसऱ्यांदा अटक केली. त्याला न्यायालयाने पाच दिवसाची पोलिस कोठडी दिली. याप्रकरणी गांधीनगर पोलिसात काही दिवसांपूर्वी गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान या अटकेची माहीती पोलिसांनी पत्रकारांना देण्यास टाळाटाळ केली.

सद्दाम खुदबुद्दीन जमादार व मयुर पाटील( दोघेही रा. मणेरमळा) यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला होता. पैकी मयुर पाटील याला आधीच अटक झाली होती.

केदार ढोणे यांचा उचगाव हद्दीत सिमेंट पाईप विक्रीचा कारखाना आहे. सद्दाम जमादार व मयूर पाटील यांनी ढोणे यांना इनोवा कार खरेदी देतो असे सांगत फेब्रुवारी 2020 ते तीन ऑगस्ट 2020 या काळात रोख व चेक ३,८८००० ची रक्कम घेतली. यावेळी सद्दाम मुजावर व मयूर पाटील यांनी एम एच 09 डी एक्स – 8699 ,एम एच 10 सी बी – 6006 या नंबरच्या दोन इनोवा कार दाखवल्या. मात्र पैसे मिळाल्यानंतर त्यांनी ढोणे यांना इनोवा कार खरेदी दिल्या नाहीत. काही कालावधी गेल्यानंतर ढोणे यांनी गाडी द्या अन्यथा पैसे परत करा असे सांगितले असता दोघांनीही पैसे परत देणार नाही व धमकी दिल्याची तक्रार ढोणे यांनी गांधीनगर पोलिसात दिली होती.दरम्यान सद्दामला गेल्याच आठवड्यात डॉ.रणजीत सावंत यांना कार देतो म्हणून फसवणूक प्रकरणी अटक झाली होती. यानंतर ढोणे याला फसवणूक प्रकरणी पुन्हा अटक करण्यात आली आहे .

Related Stories

कोल्हापुरचा शाही दसरा स्टेट फेस्टिव्हल करणार

Archana Banage

टीव्हीवर उद्यापासून `माझी शाळा मालिका’

Archana Banage

पेठ वडगावात हिंदू – मुस्लीम ऐक्याचे प्रतिक इमामे हुसेन बादशहा सवारीची स्थापना

Archana Banage

Kolhapur; ‘इंटिलेक्चुअल प्रॉपर्टी राईटस्’चा पेपर सोमवारी

Abhijeet Khandekar

प्रयाग चिखली परिसरात गव्याचे आगमन आणि निर्गमन

Abhijeet Khandekar

वडिलांना विचारून आलायं का ?

Archana Banage