Tarun Bharat

कार-दुचाकी अपघातात दोन ठार

चिंचणी येथे कारचा टायर फुटल्याने दुचाकीला उडवले

प्रतिनिधी मेढा

सातारा-मेढा रस्त्यावर चिंचणी (ता. सातारा) येथे झायलो कार व दुचाकीच्या अपघातात मेढा येथील 2 जण ठार झाले. तर चारचाकीमधील लहान मुलासह 5 जण जखमी झाले. शुक्रवार दि. 28 रोजी झालेल्या भीषण अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. भरत यदु शेलार (वय 48, रा. थोरली काळोशी) व रघुनाथ दत्तात्रय चिकणे (वय 54, रा. मेढा) अशी अपघातात ठार झालेल्या दोघांची नावे आहेत.

 याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, चारचाकी गाडी मेढय़ाहून सातारकडे येत होती. यावेळी चिंचणीनजीक झायलोचा टायर अचानक फुटल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. गाडीने समोरून येणाऱया दुचाकीस्वारास उडवले. त्यानंतर दोन्ही वाहने नाल्यामध्ये कोसळली. यात दुचाकीवरील दोघे जण गंभीर जखमी होऊन ठार झाले. चारचाकीचे चालक दत्तात्रय देशमुख (रा. कोरेगाव) यांनी दुचाकीला समोरून धडक दिली. या धडकेत रघुनाथ चिकणे व भरत शेलार यांचा जागीच मृत्यू झाला. तर चालक दत्तात्रय देशमुख यांच्यासह त्यांच्या पत्नी, मुलगा, मुलगी व सासु हे जखमी झाले. अपघातस्थळी बघ्यांची गर्दी झाली होती. जखमींना तात्काळ उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केले आहे.

     या अपघातामध्ये मृत्य पावलेले भरत शेलार व रघुनाथ चिकणे हे बी. एम्. पार्टे नागरी सह पतसंस्थेचे कर्मचारी होते. या घटनेमुळे मेढा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

  या अपघाताची माहिती मिळताच चिंचणीसह परिसरातील ग्रामस्थांनी अपघातस्थळी गर्दी केली होती. घटनास्थळी सातारा तालुक्याचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, सहायक पोलीस निरीक्षक अमोल माने यांच्या समवेत पोलीस कर्मचारी दाखल झाले. या अपघातास दत्तात्रय देशमुख यांना जबाबदार धरून त्यांच्या विरूद्ध रघुनाथ यांचा पुतण्या अक्षय चिकणे याने तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या अपघाताची नोंद तालुका पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास महेंद्र पाटोळे करत आहेत.

Related Stories

मराठा समाज लवकरच भूमिका जाहीर करणार

Archana Banage

सीपीआरमध्ये दोन वृद्ध महिलांचा मृत्यू; हातकणंगलेतील वृद्धेचा स्वॅब रिपोर्ट निगेटिव्ह

Archana Banage

ग्वाल्हेर-बँगलोर आशियाई महामार्गावर भीषण अपघात

Archana Banage

नारायण राणेंना अटक?; पोलिसांचं पथक चिपळूणला रवाना

Archana Banage

रविवार पेठेतल्या मृत बधिताच्या संपर्कातले 6 जण बाधित

Patil_p

बंदुकीचा धाक दाखवत युवतींना जीवे मारण्याचा प्रयत्न

Patil_p