Tarun Bharat

कार – बोलेरोची समोरासमोर धडक


कणकवली / वार्ताहर:


मुंबईहून गोव्याला जाणारी कार व ओरोसहून पनवेलला जात असलेली बोलेरो जीप ही दोन्ही वाहने परस्परांना धडकली. महामार्गावरील येथील गडनदी पुलानजीकच्या हळवल फाटा येथील वळणावर मंगळवारी सकाळी ६ वा. झालेल्या या अपघातात दोन्ही वाहनांमधील काही प्रवाशांना किरकोळ दुखापती झाल्या. राजेंद्र सुरेश पवार ( रा. सातारा ) हे कार ( एमएच १२ जीआर २६४२ ) घेऊन मुंबईहून गोव्याच्या दिशेने जात होते. दीपक मंगल बांगारे ( रा. ओरोस ) हे बोलेरो जीप ( एमएच ०७ क्यू ८०३१ ) घेऊन ओरोसडून पनवेलला जात होते . हळवल फाटा येथे महामार्गावर चौपदरीकरणाची एक लेन बंद अपूर्णावस्थेत असल्याने बंद आहे . परिणामी ही दोन्ही वाहने एकाच लेनवर समोरासमोर आली . यात भरधाव वेगातील कारची समोरून येणाऱ्या बोलेरो जीपला धडक बसली .

Related Stories

प्रवीण भोंसले यांनी घेतली राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट

Anuja Kudatarkar

डॉ. सारंग यांची बदली रद्द न केल्यास आंदोलन- सरपंच सेवा संघटनेचा इशारा

Anuja Kudatarkar

खवले मांजर संवर्धनासाठी सातजणांची समिती

Patil_p

अजित गाडगीळ यांना ‘आर्ट बिट’चा कला सन्मान पुरस्कार जाहीर

Anuja Kudatarkar

जिह्यात कोरोना चाचण्यात घट , रूग्णसंख्येला आळा

Omkar B

Ratnagiri Crime News : बँक ऑफ इंडियाच्या दोन शाखांना कोटीचा गंडा

Abhijeet Khandekar