Tarun Bharat

कालकुंद्री येथे २८ पासून राष्ट्रीय सेवा श्रमसंस्कार शिबिर

वार्ताहर / कुदनूर

कालकुंद्री येथे सर्वोदय शिक्षण संस्थेच्या कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय कोवाड यांच्यामार्फत राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिर मंगळवार दि. २८ जानेवारी ते सोमवार दि. ३ फेब्रुवारी पर्यंत राबविण्यात येणार असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एम. पाटील यांनी दिली आहे.

श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन मंगळवार दि. २८ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते व संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य ए. एस. जांभळे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या समारंभाला निवृत्त नेव्ही अधिकारी अशोक. के. पाटील, एम. जे. पाटील, जि प. सदस्य अरुण सुतार व कल्लाप्पाण्णा भोगण, पं. . सदस्या रुपा खांडेकर व नंदिनी पाटील आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

दुसर्‍या दिवशी २९ रोजी श्रमदानाचे उद्घाटन सेवा सोसायटीचे चेअरमन सुभाष पाटील यांच्या हस्ते होणार असून, सायंकाळी ‘ग्राम विकासात ग्रामस्थांचे योगदान’ या विषयावर कोल्हापूर जिल्हा एनएसएस समन्वयक प्रा. डॉ. डी. जी. चिघळीकर यांचे लोक प्रबोधनपर व्याख्यान होणार आहे. महिला मेळावा आणि हळदीकुंकू कार्यक्रम ३० रोजी सायंकाळी ६.३० वा. माजी सरपंच इंदूबाई जोशी यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून, ‘महिला आरोग्य आणि महिला सक्षमीकरण’ या विषयावर डॉ. अर्चना प्रवीण पाटील मार्गदर्शक करणार आहेत. तर ३१ रोजी सायंकाळी ‘श्रम प्रतिष्ठा आणि ग्रामीण विकास’ या विषयावर प्रा. एन. एस. पाटील यांचे व्याख्यान होणार आहे.
सुदृढ भारत डायबेटीस मुक्त भारत’ या विषयावर डॉ. श्रीनिवास कातकर यांचे व्याख्यान १ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.३० वा. होणार आहे. २ फेब्रु. रोजी सायं. .३० वाजता ‘राष्ट्रवाद आणि आजची तरुणाई’ या विषयावर अखलाखभाई मुजावर यांचे व्याख्यान होणार असून, रात्री ९ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. तर ३ फेब्रुवारीला संस्थेचे सचिव एम. व्ही. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि शिवसेना संघटक संग्रामसिंह कुपेकर यांच्या उपस्थितीत सांगता समारंभ होणार आहे. सात दिवसीय शिबिरात ग्रामस्वच्छता, गटर सफाई, सार्वजनिक रस्ता दुरुस्ती, समाजप्रबोधन, गटचर्चा, अंधश्रद्धा निर्मुलन, महिला आरोग्य शिक्षण, पशुसंवर्धन आदी प्रकल्प राबविले जाणार आहेत. शिबिरातील विविध कार्यक्रमांचा लाभ घेण्यासह सहकार्य करण्याचे आवाहन महाविद्यालय आणि कालकुंद्री ग्रामपंचायतीकडून करण्यात आले आहे.

Related Stories

दुकानदारांनी मास्कचा वापर न केल्यास दुकानावर कारवाई : जिल्हाधिकारी दौलत देसाई

Archana Banage

पन्हाळा पश्चिम भागात पावसाची जोरदार हजेरी

Archana Banage

कोल्हापुरात सोमवारपासून सर्व दूकाने सुरु करणार

Archana Banage

एव्हरेस्ट सर करण्यासाठी कस्तुरी सज्ज

Archana Banage

संतापजनक: कोल्हापुरात पोलिसांनी मंत्र्यासाठी वाहनधारकावर उगारला हात

Archana Banage

शिवाजी विद्यापीठाचा ऑनलाईन दीक्षांत समारंभ मंगळवारी

Archana Banage