Tarun Bharat

‘कालचा दिवस बरा होता’ म्हणण्याची वेळ

गुरुवारी कोरोनाचे 582 रुग्ण सक्रीय रुग्णसंख्या तीन हजार पार, दोघांचा मृत्यू

प्रतिनिधी / पणजी

राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची रोज नवनवीन आकडेवारी समोर येऊ लागली असून ‘कालचा दिवस बरा होता’, असे म्हणण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. बुधवारनंतर काल गुरुवारीही रुग्णसंख्येने पाचशेचा आकडा पार करत 600 च्या जवळ पोहोचली आहे. गुरुवारी एकाच दिवसात 582 बाधित सापडले असून सक्रिय रुग्णसंख्या तीन हजार पार झाली आहे. अद्याप तीन हजारांवर चाचण्यांचे अहवाल येणे बाकी असल्यामुळे ही संख्या आणखीही वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

मृत्यूचे सत्रही अखंड सुरूच असून रोज एक-दोन रुग्ण दगावत आहेत. आतापर्यंत मृतांची संख्या 842 एवढी झाली आहे. राज्यातील बहुतेक आरोग्य केंद्रे पूर्ण भरली  असून मडगाव केंद्रातील रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढत 350 च्या जवळ पोहोचली आहे. भरीस हवाई, रेल व रस्तामार्गे येणाऱया बाधितांची संख्याही दुप्पट वेगाने वाढत असून गुरुवारी 24 प्रवाशी बाधित सापडले आहेत.

गुरुवारी सापडलेल्या 582 रुग्णांद्वारे राज्यातील सक्रिय रुग्णसंख्या 3331 एवढी झाली आहे. 107 रुग्ण बरे झाले आहेत. संशयित रुग्ण म्हणून 37 जणांना गोमेकॉत भरती करण्यात आले तर 286 जणांना होम आयसोलेशन देण्यात आले आहे. आतापर्यंत एकूण 60811 जणांना कोरोनाची बाधा झाली. त्यातील 56638 जण बरे झाले.

मडगावची रुग्णसंख्या 350 च्या जवळ

राज्यात विविध आरोग्य केंद्रात उपचार घेणाऱया रुग्णात सर्वाधिक 348 रुग्ण मडगाव केंद्रात आहेत. द्वितीय स्थानी पर्वरी केंद्र आले असून तेथे 326 रुग्ण आहेत. त्याखालोखाल पणजी केंद्रात 291, फोंडय़ात 242, कांदोळीत 240, म्हापसात 179, वास्कोत 170, कुठ्ठाळीत 162, शिवोलीत 116, कासावलीत 111, खोर्लीत 110, चिंबल 91, डिचोली 86, सांगे 70, चिंचिणी 69, हळदोणे 64, सांखळीत 62, पेडणे 61, कुडचडे 60, लोटली 56, कोलवाळ व काणकोणमध्ये प्रत्येकी 45, कुडतरी 44, शिरोडा व नावेलीत प्रत्येकी 39 रुग्ण आहेत. अन्य सर्वत्र त्यापेक्षा कमी रुग्ण आहेत.

सक्रीय रुग्णांची केंद्रवार संख्या पुढीलप्रमाणे आहेः डिचोली 86, सांखळी 62, पेडणे 61, वाळपई 19, म्हापसा 179, पणजी 291, हळदोणा 64, बेतकी 13, कांदोळी 240, कासारवर्णे 27, कोलवाळ 45, खोर्ली 110, चिंबल 91, शिवोली 116, पर्वरी 326, मये 22, कुडचडे 60, काणकोण 45, मडगाव 348, वास्को 170, बाळ्ळी 29, कासावली 111, चिंचिणी 69, कुठ्ठाळी 162, कुडतरी 44, लोटली 56, मडकई 14, केपे 27, सांगे 70, शिरोडा 39, धारबांदोडा 30, फोंडा 242 व नावेलीत 39 रुग्ण आहेत.

  • 08 एप्रिलपर्यंतचे एकूण रुग्ण                    60811
  • 08 एप्रिलपर्यंतचे बरे झालेले रुग्ण 56638
  • 08 एप्रिलपर्यंतचे सक्रिय रुग्ण                   3331
  • 08 एप्रिल रोजीचे नवे रुग्ण                      582
  • 08 एप्रिल रोजी बरे झालेले रुग्ण   107
  • 08 एप्रिल रोजीचे बळी               02
  • आतापर्यंतचे एकूण बळी                842

कोरोना लसीकरण शंभर टक्के पूर्ण करा

कोरोनाचे लसीकरण वाढवून ते 100 टक्के पूर्ण करा अशी सूचना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्वयंपूर्ण मित्रांना केली असून तसे झाले तरच कोरोनाचे बळी कमी होतील, असे निवेदनही त्यांनी केले.

पणजीतील इन्स्टिटय़ूट मिनेझिस ब्रागांझा हॉलमध्ये सरकारतर्फे नेमण्यात आलेल्या 191 स्वयंपूर्ण मित्रांची सभा घेण्यात आली. त्यावेळी त्यांना मार्गदर्शन करताना डॉ. सावंत बोलत होते. स्वयंपूर्ण मित्रांनी गावागावात जाऊन पंचायत पातळीवर 45 वर्षांवरील लोकांची यादी तयार करावी आणि त्यांचे लसीकरण यशस्वी करावे. कोरोनातून मुक्त होण्यासाठी लसीकरण महत्त्वाचे आहे.

वय वर्षे 45 व त्यापेक्षा जास्त वयाच्या लोकांना कोरोनाची बाधा होण्याची शक्यता जास्त असल्याने त्यांना लस मिळणे आवश्यक आहे. त्यांच्यात जागृती करुन त्यांना लस घेण्यासाठी प्रवृत्त करावे तरच कोरोनाचे बळी, वाढते रुग्ण नियंत्रणात येतील आणि आपण कोरोनाला रोखू शकू असा विश्वास डॉ. सावंत यांनी प्रकट केला. सध्या आरोग्य केंद्रातून लसीकरण सुरु आहे, परंतु हवा तसा प्रतिसाद नाही. तो वाढवण्यासाठी स्वयंपूर्ण मित्रांचे योगदान महत्त्वाचे असून ते त्यांनी द्यावे असे आवाहन डॉ. सावंत यांनी केले. पंचायत पातळीवर लसीकरण सुरु करण्याचा सरकारचा इरादा असून त्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती डॉ. सावंत यांनी दिली.

Related Stories

सभापतींसह ‘त्या’ दहा आमदारांना नोटीस

Amit Kulkarni

नागेश गोसावी यांचा विर्नोडा येथे सत्कार

Amit Kulkarni

कला अकादमीत नियम धाब्यावर बसवून बढत्या

Omkar B

पालकांकडून शाळांनी हमीपत्रे घेऊ नये

Amit Kulkarni

भाजपतर्फे 4 पासून गरीब कल्याण मेळावे

Amit Kulkarni

मुख्यमंत्र्यांनी घेतली श्रीपादभाऊंची भेट

Amit Kulkarni