Tarun Bharat

काल्पनिक बाहुलीसोबत विवाह

तांत्रिकदृष्टय़ा प्रगत जपानमधील अजब प्रकार

जपानच्या एका व्यक्तीने 4 वर्षांपूर्वी एका काल्पनिक वधूसोबत विवाह केला होता. आता माझ्या जीवनात समस्या उभी राहिली असल्याचे त्याचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे त्याने हा विवाह स्वतःच्या मर्जीने केला होता.

ज्या महिलेसोबत या व्यक्तीने विवाह केला होता, ती एक कॉम्प्युटरद्वारे तयार करण्यात आलेली पॉप गायिका आहे. 38 वर्षीय हा व्यक्ती स्वतःच्या पत्नीवर प्रचंड प्रेम करतो, परंतु आता त्याच्यासमोर एक समस्या उभी राहिली आहे, आता तो स्वतःच्या पत्नीसोबत संभाषण करू शकत नाही.

या व्यक्तीचे नाव अकिहिको कोंडो असून तो जपानचा नागरिक आहे. अकिहिको हा हत्सुने मिकोसोबत डेट करत होता. हत्सुने मिको एक सॉफ्टवेअर व्हॉइसबँक असून ज्याला जपानमध्ये क्रिप्टन फ्यूचर मीडियाने विकसित केले होते.

अकिहिको कोंडो हा एक फिक्टोसेक्सुअल व्यक्ती आहे. सेक्सुअली काल्पनिक पात्राकडे आकर्षित होणाऱयांना फिक्टोसेक्सुअल म्हटले जाते. कोंडोने स्वतःच्या या विवाहावर 13 लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम खर्च केली होती, परंतु त्याच्या या विवाहसोहळय़ात त्याचे कुटुंबीय वगळता कुणीच भाग घेतला नव्हता. अकिहिकोने 2018 मध्ये हत्सुने मिकोसोबत विवाह केला होता.

माझ्या विवाहाला 4 वर्षे झाली असून हत्सुनेसोबत मी आता संभाषण करू शकत नसल्याचे त्याचे म्हणणे आहे. गेटबॉक्स या यंत्राद्वारे कुणीही होलोग्रामच्या मदतीने काल्पनिक पात्राशी संभाषण करू शकतो आणि विवाह देखील करू शकतो.  अकिहिडोचे गेटबॉक्स सॉफ्टवेअरच्या मदतीने संभाषण व्हायचे. परंतु त्याच्याकडील सॉफ्टवेअर कालबाहय़ ठरल्याने त्याला स्वतःच्या काल्पनिक पत्नीशी संभाषण करता येत नाही. जपानमध्ये अशाप्रकारचे नातेसंबंध बाळगणारे अनेक व्यक्ती आहेत.

Related Stories

अवधूत आजही शोधतोय हरवलेली गोष्ट

Patil_p

नाट्य दिग्दर्शक विजय केंकरे यांना कोरोनाची बाधा

Tousif Mujawar

ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी साकारणार जिजामातांची भूमिका!

Tousif Mujawar

जॅकीदादाने कुणासमोर जोडले हात?

Patil_p

डॅनियल क्रेग नौदलात मानद कमांडर

Patil_p

दिग्गज कलाकार तरीही ‘तांडव’ प्रभावहीन

Patil_p