Tarun Bharat

काळचौंडी येथे साडेचार लाखांची घरफोडी

Advertisements

प्रतिनिधी/ सातारा

माण तालुक्यातील काळचौंडी गावातील बंद बंगल्याच्या पाठीमागील बाजुचा दरवाजा उचकटून रात्रीच्या वेळी घरात प्रवेश करुन अज्ञात चोरटय़ांनी रोख रक्कम, दागिने असा एकूण 4 लाख 26 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना दि. 2 रोजी घडली. यामुळे परिसरासत एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तक्रारदार किसन काशीनाथ माने (वय 50, रा. काळचौंडी, ता. माण) येथे बंगला आहे. दि. 2 ते 3 रोजी दरम्यान, मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरटय़ांनी बंगल्याच्या पाठीमागील ग्रीलचे कुलूप तोडून व दरवाजा कशाने तरी तोडून घरात प्रवेश केला.

चोरटय़ांनी बेडरुममध्ये ठेवलेले लोखंडी कपाट उघडून कपाटातील 76 हजार रुपयांची रोख रक्कम, 1 लाख 90 हजार रुपयांची 9.5 तोळे वजनाची सोन्याची चैन, एक लाख रुपये किंमतीचा सोन्याचा राणीहार, 60 हजार रुपये किंमतीच्या सोन्याच्या अंगठया असा एकूण 4 लाख 26 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरुन नेला.

लाखो रुपयांच्या या चोरीच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून घटनास्थळी कोरेगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे यांनी भेट देवून पाहणी केली व तपासाबाबत मार्गदर्शन केले. किसन माने यांच्या तक्रारीनंतर अज्ञात चोरटय़ांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून या चोरीचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विशाल भंडारे करत आहेत.

Related Stories

कराडजवळ कंटेनरचा भीषण अपघात, दुचाकीस्वाराला चिरडले

Archana Banage

साखरपुडय़ाच्या कार्यक्रमातून 14 तोळे लंपास

Patil_p

सातारा : अन्यथा संबंधीतांवर फौजदारी गुन्हे दाखल करु !

Archana Banage

गंभीर : जिल्हय़ात 12 बाधितांच्या मृत्यूने खळबळ

Patil_p

शेतजमिनीवरुन सावत्र भावाकडून बहिणीस मारहाण

Patil_p

सातारा पंचायत समितीत शॉर्ट सर्किटने गणपतीच्या आरासीला आग

Archana Banage
error: Content is protected !!