Tarun Bharat

काळादिन ‘मेसेज’ खटला लांबणीवर

4 नोव्हेंबर रोजी पुढील सुनावणी

प्रतिनिधी /बेळगाव

म. ए. समितीच्यावतीने 1 नोव्हेंबर हा काळादिन म्हणून पाळला जातो. सीमाभागामध्ये सर्वच मराठी भाषिक काळादिन गांभीर्याने पाळत आले आहेत. त्याची जनजागृती करण्यासाठी तिघांनी मोबाईलवर मेसेज केला म्हणून त्यांच्यावर गुन्हा नोंदविला होता. या खटल्याची सुनावणी सोमवारी होणार होती. मात्र साक्षीदार आले नसल्याने ती सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.

म. ए. समितीचे कार्यकर्ते दत्ता मनोज येळ्ळूरकर (दीपक गल्ली-जुने गांधीनगर), मारुती पुंडलिक पाटील (रा. बेनकनहळ्ळी), केदारी रामा करडी (रा. मच्छे) यांनी हा मेसेज केला होता. 1 नंबर काळा दिवस, देख लेना आँखेंसे, हम आऐंगे लाखांसे, आम्ही बेळगावकर, बेळगाव माझा आता खूप झाले मराठय़ांनो, वेळ काढा बाहेर पडा, 1 नोव्हेंबर काळा दिवस बेळगाव सीमाभागाचा, मी तर चाललोय तुम्ही येणार ना-निषेध अशा प्रकारचा मेसेज खडेबाजार पोलीस स्थानकाचे तत्कालीन पोलीस निरीक्षक यु. एच. सातेनहळ्ळी यांच्या मोबाईलवर आला.

कित्तूर चन्नम्मा चौक येथे 24 ऑक्टोबर 2016 रोजी सेवा बजावताना त्यांना हा मेसेज आला. त्यानंतर त्यांनी या तिघांवर हा गुन्हा नोंदविला होता. या खटल्याची सुनावणी तिसरे जेएमएफसी न्यायालयामध्ये सुरू आहे. मात्र साक्षीदार आले नसल्याने 4 नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. म. ए. समिती कार्यकर्त्यांच्यावतीने ऍड. प्रताप यादव, ऍड. महेश बिर्जे हे काम पाहत आहेत.

Related Stories

बिबटय़ाने रेसकोर्सची भिंत ओलांडली?

Patil_p

चिकोडी रोड-रायबाग दुपदरीकरणाचे काम पूर्ण

Patil_p

मराठा संघातर्फे अभियंता दिन साजरा

Omkar B

जि.पं.स्थायी समिती निवडणुकीबाबत भिन्न मते

Patil_p

शेडबाळ-बेळगाव रेल्वेचा शुभारंभ

Patil_p

कंग्राळी बुद्रुक-गौंडवाड येथे मतदान चुरशीने

Amit Kulkarni