Tarun Bharat

काळय़ा यादीतील गुन्हेगारांना तंबी

प्रतिनिधी /बेळगाव

महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी टिळकवाडी व माळमारुती पोलिसांनी काळय़ा यादीतील गुन्हेगारांची परेड घेतली. निवडणुकीच्या काळात अशांतता माजविण्याचा प्रयत्न केलात तर याद राखा, अशी तंबी अधिकाऱयांनी त्यांना दिली.

खडेबाजारचे एसीपी ए. चंद्राप्पा यांच्या नेतृत्वाखाली टिळकवाडी पोलीस स्थानकात परेड झाली तर मार्केटचे एसीपी सदाशिव कट्टीमनी यांच्या नेतृत्वाखाली माळमारुती पोलीस स्थानकाबाहेर काळय़ा यादीतील गुन्हेगारांची परेड घेण्यात आली. अधिकाऱयांनी गुन्हेगारांची हजेरी घेतली. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडावी, यासाठी पोलीस दलाने तयारी केली आहे. यापूर्वी वेगवेगळय़ा प्रकरणात गुन्हेगारांच्या काळय़ा यादीत समाविष्ट करण्यात आलेल्या तरुणांना पोलीस स्थानकात बोलावून त्यांना तंबी देण्यात आली. कोणत्याही प्रकारे शांतताभंग करण्याचा प्रयत्न केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा अधिकाऱयांनी दिला.

Related Stories

चापगाव, नंदगड भागात वारंवार खंडित वीजपुरवठय़ामुळे नागरिक हैराण

Amit Kulkarni

बसवेश्वर चौकाजवळील मातीचे ढिगारे हटविले

Amit Kulkarni

स्वतःपेक्षा आम्हाला काळजी उंटांचीच!

Amit Kulkarni

दैवदीप धामणेकरची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

Amit Kulkarni

शिवसेनेच्या हुतात्म्यांना उद्या अभिवादन

Patil_p

तवंदीला 8 दिवसातून एकदा पाणी

Amit Kulkarni