Tarun Bharat

काशीळ येथे दोन एसटी बसचा अपघात

बंद पडलेल्या बसला दुसऱया बसची पाठीमागून धडक

प्रतिनिधी/ नागठाणे

बंद पडलेल्या एसटी बसला पाठीमागून आलेल्या दुसऱया एसटी बसने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका वाहकासह नऊ प्रवासी जखमी झाले. ग्वाल्हेर-बेंगलोर आशियाई महामार्गावर शिवराजनगर (काशीळ) ता. सातारा येथे गुरुवारी दुपारी हा अपघात झाला. या अपघाताची फिर्याद प्रकाश तुकाराम डिसले (सांगली आगार बसचालक, रा. वसगडे, ता. पलूस, जि. सातारा) यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात दिली आहे.

याबाबत बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सांगली आगाराची सातारा ते सांगली जाणारी बस गुरुवारी दुपारी 3 च्या सुमारास महामार्गावर शिवराजनगर (काशीळ) येथे बंद पडल्याने चालकाने बस महामार्गालगत बाजूला उभी केली होती. या नादुरुस्त बसला पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या स्वारगेट- कोल्हापूर या एसटी बसने जोरदार धडक दिली. धडक एवढी जोरदार होती की बंद पडलेली बस सुमारे 5 ते 6 फूट पुढे गेली.

या अपघातात स्वारगेट-कोल्हापूर बसचा वाहक दगडू वसंत मुगदल (वय.52, रा. वडनगे, ता. करवीर, जि. कोल्हापूर) यांच्यासह त्यातील प्रवाशी शुभम दगडू मुगदल (वय 20), वैशाली दगडू मुगदल (वय 44, दोघे रा. वडगणे, ता. करवीर, जि. कोल्हापूर), संदीप कागले (वय 48), तुषार संतोष कागले (वय 21) कोमल संतोष कागले (वय 23), शारदा संतोष कागले (वय 47), आदित्य संतोष कागले (वय 17, सर्व रा. सेवाधाननगर चिथोड, जि. धुळे), संगिता संतोष पोतदार (वय 38, रा. मलकापूर, कराड) हे गंभीर व किरकोळ जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच सपोनि डॉ. सागर वाघ, हवालदार सुनील जाधव, मनोहर सुर्वे, किरण निकम यानी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णवाहिकेने उपचारासाठी कराड येथे पाठवले. अपघातात दोन्ही एसटी बसचे बरेच नुकसान झाले आहे. अपघाताची नोंद बोरगाव पोलीस ठाण्यात झाली असून स्वारगेट- कोल्हापूर बसचालक अजित मारुती पाटील (रा. तिटवे, राधानगरी, कोल्हापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार मनोहर सुर्वे व किरण निकम करत आहेत.

Related Stories

महापालिका निवडणुकीत शिंदे-भाजप एकत्र, ‘या’ महापालिकेत युतीचा नारळ फुटला

Rahul Gadkar

गावे गावी फिरून जगाचे भविष्य सांगणाऱ्या नंदीबैल कुटुंबीयांची उपासमार

Archana Banage

शेतकऱयाना हेक्टरी 50 ते 60 लाख रुपये दर मिळावा

Patil_p

संजय राऊत कुणी महान नेते नाहीत- चंद्रकांतदादा पाटील

Abhijeet Khandekar

ओमिक्रॉनने थैमान घातलेल्या दक्षिण आफ्रिकेतून 1 हजार प्रवासी मुंबईत

datta jadhav

सदगीर, पृथ्वीराज, सिकंदर, माऊलीची आगेकूच

datta jadhav