Tarun Bharat

काश्मिरी पंडितांना त्यांचे ‘वतन’ मिळेलच

पुढच्या ‘नवरेह’पर्यंत याची पूर्तता होणे आवश्यक 

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

धर्मांधतेकडून झालेले अन्याय आणि अत्याचारांमुळे आपल्या देशातच ज्यांच्यावर निर्वासित होण्याची वेळ आली त्या काश्मीरी पंडितांसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी काश्मीरी नववर्षाचा शुभसंदेश दिला आहे. काश्मीरी भाषेत नववर्ष ‘नवरेह’ म्हणून ओळखले जाते. पुढच्या नवरेहपर्यंत काश्मीर पंडितांना गमवावे लागलेले ‘वतन’ पुन्हा मिळणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.

या समाजास हालअपेष्टा आणि अपमान सोसावा लागला असला तरी लवकरच त्यांना सन्मानाने त्यांच्या मूळ स्थानी जाण्याची संधी मिळणार आहे. नवरेहच्या दिवशी आम्ही हा संकल्प आपल्या समवेत केला आहे. चांगले-वाईट दिवस प्रत्येकाच्या जीवनात येतात. मात्र, त्यातून निर्धाराने तरुन जाणे आवश्यक असते. काश्मीरी पंडितांनी हा निर्धार दाखविला आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

इस्रायलचा आदर्श

प्राचीन काळी इस्रायलचे लोकही असेच अन्यायामुळे आणि शोषणामुळे विखुरले गेले होते. आपल्या मूळ स्थानाला पारखे झाले होते. तथापि, त्यांनाही नंतर त्यांचे मूळ स्थान परत मिळाले. त्यासाठी जो संघर्ष करावा लागला, तो त्यांनी हसत हसत स्वीकारला. काश्मीरी पंडितांची कथाही यापेक्षा वेगळी नाही. त्यांनाही लवकरात लवकर न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन भागवतांनी केले.

काश्मीर फाईल्सचाही उल्लेख

काश्मीर हिंदूंवरच्या अत्याचारांना वाचा फोडणाऱया काश्मीर फाईल्स या चित्रपटाचाही त्यांनी उल्लेख संदेशात केला आहे. या चित्रपटातून या समाजावरील अन्यायाचे सत्य चित्रण जगासमोर मांडले गेले आहे. हिंदू समाज जगात कोठेही आपले स्थान बनविण्यास समर्थ आहे. आज अनेक देशांमध्ये हिंदू सुस्थापित झाले आहेत. पण अन्यायामुळे ज्यांना वतन सोडावे लागले त्यांना ते पुन्हा मिळवून देण्याचे कार्य करणेही तितकेच आवश्यक आहे. काश्मीरी पंडितांच्या संदर्भातही हे लवकरच घडणार आहे, असा विश्वास त्यांनी या संदेशातून व्यक्त केला आहे.

Related Stories

तीन्ही सेनादलांचे प्रमुख पंतप्रधान मोदींच्या भेटणार

Patil_p

सावरकरांना राजकारणात ओढू नका!

Patil_p

हिमाचल प्रदेशात कोरोना रुग्णांची संख्या 1083 वर

Tousif Mujawar

महिलांनाही होता येणारा मार्कोस कमांडो

Patil_p

मागील चोवीस तासात बीएसएफचे 16 जवान कोरोना पॉझिटिव्ह

Tousif Mujawar

गुरुग्राममध्ये घरातून स्फोटके जप्त

Patil_p