Tarun Bharat

काश्मीरमधील हत्यांप्रश्नी केंद्रीय गृह मंत्रालय सतर्क

Advertisements

सीआरपीएफ डीजींना पाठवले जम्मू काश्मीरमध्ये – हल्ल्यांच्या भीतीमुळे स्थलांतरित कामगार परतीच्या वाटेवर

श्रीनगर, नवी दिल्ली / वृत्तसंस्था

गेल्या काही दिवसात जम्मू काश्मीरमध्ये सामान्य नागरिकांच्या हत्येच्या घटना वाढल्या आहेत. मागील दोन दिवसात चार बिगर काश्मिरींची हत्या झाल्यानंतर आता केंद्र सरकारने आक्रमक पाऊल उचलले आहे. काश्मीरमधील बदलत्या स्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी गृह मंत्रालयाने सीआरपीएफचे डीजी कुलदीप सिंह यांना जम्मू काश्मीरला पाठवले आहे. कुलदीप सिंग हे एनआयएचेही डीजी आहेत. तसेच आयबी, एनआयए, लष्कर, सीआरपीएफचे वरि÷ अधिकारी सध्या जम्मू काश्मीरमध्ये तळ ठोकून आहेत.

 जम्मू काश्मीरमध्ये सुरु असणाऱया टार्गेट किलिंग प्रकरणी आता केंद्र सरकारने मोठी पावले उचलण्यास सुरुवात केल्याचे पाहायला मिळत आहे. या संपूर्ण हत्यासत्र प्रकरणावर आता केंद्राची नजर असून त्यादृष्टीने मोठय़ा हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत. याच धर्तीवर महत्त्वाच्या अधिकाऱयांना जम्मू काश्मीरमध्ये रवाना केले आहे. सुरक्षा यंत्रणांकडून उचलल्या जाणाऱया या पावलांमुळे दहशतवादी संघटनांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. जम्मू काश्मीरमध्ये सुरु असणाऱया टार्गेट किलिंग प्रकरणाने साऱया देशाला हादरा दिला आहे. दहशतवाद्यांच्या या कारवाया पाहता आता त्यांचे हल्ले आणखी सहन न करण्याचा मनसुबा बाळगत गृह मंत्रालय सक्तीच्या कारवाई करताना दिसत आहे.

दहशतवाद्यांविरोधात जोरदार मोहीम

एकंदर स्थिती पाहता संशयित दहशतवाद्यांवर मोठी कारवाई केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या 9 दिवसात भारतीय सैन्याने वेगवेगळय़ा चकमकींमध्ये 13 दहशतवाद्यांना ठार केले आहे. या वषीच्या जानेवारीपासून आत्तापर्यंतच्या आकडेवारीनुसार, सैन्याच्या कारवाईत 132 हून अधिक दहशतवादी मारले गेले आहेत. तर 254 दहशतवाद्यांना अटकही करण्यात आली आहे.

परराज्यातील कामगार माघारी

गेल्या दोन दिवसात पाच बिगर काश्मिरींवर हल्ले झाल्यानंतर येथील परराज्यातील कामगार आणि नागरिकांनी माघारी फिरण्याचा निर्णय घेतला आहे. येथील रेल्वे आणि बस स्थानकांवर सोमवारपासून माघारी परतणाऱयांची गर्दी दिसून येत होती. हे स्थलांतरित कामगार विशेषतः बिहार आणि उत्तर प्रदेशमधील होते.

सुरक्षा अधिकाऱयांची महत्त्वपूर्ण बैठक

सामान्य नागरिकांच्या हत्येच्या घटनेत वाढ होतानाच आता राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्यावर गृहमंत्री अमित शहा यांनी सर्व राज्यांच्या डीजीपी आणि आयजींची बैठक बोलावली होती. या बैठकीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवालही सहभागी झाले होते. यावेळी जम्मू काश्मीरच्या परिस्थितीसोबत अनेक महत्वाच्या सुरक्षेच्या मुद्यावर चर्चा करण्यात आली. या बैठकीतील विषयांबाबत सध्या कोणतीही माहिती उघड करण्यात आलेली नाही.

Related Stories

11 पाकिस्तानी शरणार्थींचा जोधपूरमध्ये संशयास्पद मृत्यू

Patil_p

उपचारास नकार देणाऱया खासगी रुग्णालयांवर कारवाई करणार

Tousif Mujawar

दिल्लीत भिषण आग, अनेकजण अडकले

prashant_c

घुसखोर…सर्वसामान्य नागरिक…शरणार्थी

Patil_p

”नवनीत राणा यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि अभिनय क्षेत्रात पुन्हा नशीब आजमावून पाहावं”

Archana Banage

भारताचा मालदीवसोबत संरक्षण कर्ज करार

datta jadhav
error: Content is protected !!