Tarun Bharat

काश्मीरमध्ये अधिकाऱ्यांवर बेधडक कारवाई

Advertisements

बनावट शस्त्रपरवाना बनवणाऱयांची 5 कोटींची मालमत्ता जप्त

श्रीनगर / वृत्तसंस्था

जम्मू काश्मीरमध्ये लाच घेऊन शस्त्रपरवाने बनवणाऱया अधिकाऱयांची पाच कोटींची मालमत्ता अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जप्त केली आहे. या अधिकाऱयांनी केंद्रीय निमलष्करी दल किंवा लष्करी जवानांच्या नावाने सर्वसामान्यांना शस्त्रे दिल्याचे तपासात समोर आले आहे. संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱयांनी जवळपास 40 कोटींची मालमत्ता बनवेगिरीतून साकारली असल्याचा दावा केला जात आहे. त्या अनुषंगाने प्राप्त झालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये सर्व नियम डावलून जारी करण्यात आलेल्या शस्त्र परवाना प्रकरणात प्रशासनातील अनेक विद्यमान आणि निवृत्त अधिकाऱयांसह अनेक दलाल आरोपी आहेत. केंद्रीय अन्वेषण ब्यूरोच्या विशेष गुन्हे शाखेने नोंदवलेल्या एफआयआरच्या आधारे मनी लाँडरिंग कायद्यांतर्गत हा खटला सुरू करण्यात आला आहे. यामध्ये कुपवाडा जिल्हय़ाचे तत्कालीन उपायुक्त आणि अन्य अधिकारी संशयाच्या भोवऱयात असल्याचे अंमलबजावणी संचालनालयाच्या एका वरि÷ अधिकाऱयाने सांगितले.

जम्मू-काश्मीरमधील अनेक अधिकाऱयांनी सर्व नियम आणि कायदे झुगारून दलालांच्या संगनमताने अनेक लोकांचे बनावट शस्त्र परवाने बनवले असल्याची माहिती समोर आली आहे. अधिकाऱयांनी ही रक्कम त्यांच्या नातेवाईकांच्या बँक खात्यात जमा केली आहे, असा संचालनालयाचा दावा आहे.

गेल्या आठवडय़ात जम्मू-काश्मीरमध्ये 11 वेगवेगळय़ा ठिकाणी छापे टाकण्यात आले. अनेक सेवानिवृत्त अधिकारी आणि त्यांच्या दलालांच्या घरांवर छापे टाकण्यात आले. या छाप्यात अडीच कोटी रुपयांच्या रोकड आणि दागिन्यांसह अनेक गुन्हे दाखलेही जप्त करण्यात आले आहेत, असे ईडीच्या अधिकाऱयाने स्पष्ट केले.

Related Stories

एका स्मार्ट शहराची निर्मिती

Patil_p

परमबीर सिंह यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

Abhijeet Shinde

जीएसटी संकलन 1 लाख कोटींवर

Patil_p

गुंजीत आठवडी बाजाराला सुरुवात

Patil_p

सर्व भारतीयांना सुरक्षितपणे आणणार!

Amit Kulkarni

मोदींच्या शासनकाळात आर्थिक विषमतेत वाढ

Patil_p
error: Content is protected !!