Tarun Bharat

काश्मीरमध्ये चकमकीत दहशतवाद्याला कंठस्नान

Advertisements

श्रीनगरच्या नौगावमध्ये सुरक्षा दलांची कारवाई – ग्रेनेडसह दारूगोळा हस्तगत

वृत्तसंस्था/ श्रीनगर

जम्मू-काश्मीरच्या नौगावमध्ये सुरक्षा दलांनी एका चकमकीत बुधवारी दहशतवाद्याला कंठस्नान घातले आहे. मारले गेलेल्या दहशतवाद्याचे नाव उजैर अशरफ दार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. चकमक स्थळावरून एक पिस्तुल, मॅगजीन आणि 2 ग्रेनेड हस्तगत करण्यात आले आहेत. संबंधित परिसरात दोन दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्याने सुरक्षा दलांनी शोधमोहीम हाती घेतली आहे.

पोलीस आणि सीआरपीएफला मंगळवारी नौगावमध्ये दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती. याच्या आधारावर शोधमोहीम सुरू करण्यात आली असता दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता.

यापूर्वी 12 जून रोजी बारामुल्लामध्ये दहशतवाद्यांनी पोलीस आणि सीआरपीएफच्या पथकाला लक्ष्य केले होते. सोपोरमध्ये दहशतवाद्यांच्या गोळीबारत दोन पोलीस हुतात्मा झाले होते. तर दोन नागरिकांचा मृत्यू झाला होता. हा हल्ला लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांनी घडवून आणला होता.

Related Stories

भारताने पूर्ण केला १५० कोटी लसीकरणाचा टप्पा

Archana Banage

देशवासियांना मोठा दिलासा; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिली पॉझिटिव्ह बातमी

Archana Banage

कृषी कायद्यांवर आज पुन्हा सुनावणी

Patil_p

देशात 4.72 लाख उपचारार्थ रुग्ण

datta jadhav

१५ वर्षापेक्षा जुनी असलेली वाहने आता भंगारात निघणार; मंत्री गडकरींची घोषणा

Archana Banage

जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेच्या 7 जागा वाढणार

datta jadhav
error: Content is protected !!