Tarun Bharat

काश्मीरमध्ये हिमस्खलन, तीन जवान शहीद, एक बेपत्ता

ऑनलाइन टीम / काश्मीर : 

जम्मू -काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठय़ा प्रमाणात बर्फवृष्टी होत आहे. तर गेल्या 48 तासांत उत्तर काश्मीरमधील कुपवाडा जिह्यातील काही भागात हिमस्खलन झालं. या बर्फाखाली दबून तीन जवान शहीद झाले. तर एक जवान अद्याप बेपत्ता आहे. दरम्यान लष्कराने या ठिकाणी बचावकार्य सुरू केले असून अनेक जवानांना बाहेर काढण्यात आलं आहे.

लष्कराच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 48 तासांत झालेल्या बर्फवृष्टीमुळे उत्तर काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी हिमस्खलन झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. काश्मीरमधील गांदरबल जिह्यात सोनमर्गच्या गग्गेनेर भागाजवळ कुलान गावात हिमस्खलन झाले. बर्फाखाली दबलेल्या पाच जणांना वाचवण्यात यश आलं आहे. अन्य बेपत्ता लोकांचा तपास सुरू आहे.

दरम्यान, थंडीचं प्रमाणही वाढलं आहे. पावसाचं पाणी रस्त्यांवर साचलं होतं. त्यामुळं वाहतूकही मंदावली होती.

 

Related Stories

कचरामुक्त शहरांची यादी जाहीर

Patil_p

IAS टॉपर टीना डाबी -अतहर आमीर अखेर विभक्त; न्यायलयाकडून घटस्फोटावर शिक्कामोर्तब

Archana Banage

हैदराबादमध्ये भाजपचे दिग्गज प्रचारात

Omkar B

जोधपूर कारागृहात आसाराम बापूची तब्येत बिघडली; रुग्णालयात दाखल

Tousif Mujawar

ब्रिटनमधील राजदूतपदी विक्रम दोराईस्वामी

Patil_p

दिल्ली : सलग दुसऱ्या दिवशीही कोरोना रुग्ण संख्येत लक्षणीय वाढ

Tousif Mujawar