Tarun Bharat

काश्मीर भारताचा अंतर्गत विषय!

vतालिबानच्या स्पष्टोक्तीमुळे पाकिस्तानला झटका :  हस्तक्षेप करणार नसल्याची भूमिका

वृत्तसंस्था/ काबूल

काश्मीरमध्ये पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादी कारवायांमध्ये सामील नसल्याचे तालिबानने स्पष्ट केले आहे. काश्मीर हा भारताचा अंतर्गत विषय आहे. तालिबान अन्य देशांच्या अंतर्गत विषयांमध्ये हस्तक्षेप करत नसल्याचे तालिबानच्या राजकीय शाखेचे प्रवक्ते सुहेल शाहीन यांनी ट्विटद्वारे जाहीर केले आहे. या भूमिकेद्वारे तालिबानने काश्मीरमध्ये सुरू असलेल्या दहशतवादी कारवायांना समर्थन नसल्याचे स्पष्ट केले आहे.

अमेरिकेसोबत होत असलेल्या कराराच्या चर्चेत सुहेल यांनीच तालिबानचे प्रतिनिधित्व केले आहे.  काश्मीर मुद्दा सोडविल्याशिवाय भारताशी चर्चा करता येणार नसल्याचे विधान तालिबानचे प्रवक्ते जबिउल्लाह मुजाहिद यांनी केल्याचा दावा समाजमाध्यमांवर पसरला होता. काबूलमध्ये सत्ता संपादन केल्यावर तालिबान काश्मीरमध्ये कारवाया सुरू करणार असल्याचे वृत्त पसरविण्यात आले होते.

भारताने साधला संपर्क

तालिबानच्या या कथित विधानानंतर भारताने अफगाणिस्तानात त्याच्या नेत्यांशी संपर्क साधला होता. या घडामोडींनंतर तालिबानचे प्रवक्ते सुहेल यांनी ट्विट करत सर्व दावे फेटाळून लावले आहेत. परंतु तालिबान छोटय़ा-छोटय़ा संघटनांचा एक गट आहे.

यातील अनेक गटांनी पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांचे समर्थन पेले आहे. परंतु पाकिस्तानच्या हक्कानी नेटवर्कला तालिबानच्या नव्या भूमिकेमुळे मोठा धक्का बसणार आहे.

भारत महत्त्वाचा साथीदार

युद्धाने जर्जर देशाच्या पुनउ&भारणी आणि शांतता प्रक्रियेत मदत करणाऱया महत्त्वपूर्ण देशांमध्ये भारत सामील आहे. अफगाणिस्तानचे भारताशी असलेले संबंध आंतरराष्ट्रीय मापदंड आणि परस्पर सन्मानावर आधारित असल्याचे उद्गार अफगाणिस्तानच्या विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते ग्रान हेवाद यांनी काढले आहेत. भारताने अफगाणिस्तानातील शांता तसेच तडजोड प्रक्रियेचे समर्थन केले आहे. अफगाणिस्तानचे काळजीवाहू विदेशमंत्री मोहम्मद हनीफ अत्मार यांनी विदेशमंत्री एस. जयशंकर यांच्याशी सोमवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली आहे. दोन्ही नेत्यांनी आर्थिक आणि सुरक्षा सहकार्यासह परस्पर हितसंबंधांच्या मुद्दय़ांवर चर्चा केली आहे.

Related Stories

त्रालमध्ये तीन दहशतवाद्यांना कंठस्नान

datta jadhav

पंतप्रधान सत्य कधीच कैद करू शकत नाहीत : राहुल गांधी

Archana Banage

धामोडपैकी कुरणेवाडीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आरोपीस अटक

Archana Banage

अंबाबाई दक्षिणा पेटीत 67 लाख 65 हजार रुपये प्राप्त

Abhijeet Khandekar

लखीमपूर खेरी हिंसाचारातील मृतांची संख्या 9 वर

datta jadhav

मंत्रीपद विस्ताराबाबत एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा, म्हणाले…

Archana Banage