Tarun Bharat

कासार्डेत बुलेट घसरून तरुण जागीच ठार

कणकवली:

कासार्डेहून नांदगावाला जात असताना बुलेट घसरून झालेल्या अपघातात दिगंबर महादेव केसरकर (38, रा. कासार्डे) यांचा जागीच मृत्यू झाला. मुंबई-गोवा महामार्गावरील कासार्डे-ब्राह्मणवाडी येथे सायंकाळी 4.45 वाजण्याचा सुमारास हा अपघात घडला.

दिगंबर यांचा छोटा भाऊ गणेश याची कार नांदगाव-पावाचीवाडी येथे बंद पडली होती. गणेश याने दिगंबरला याबाबत फोनवरून माहिती दिली. त्यानंतर दिगंबर बुलेट (एमएच-04/जेआर-9696) घेऊन कासार्डेहून नांदगावाला जात असताना कासार्डे-ब्राह्मणवाडी येथे बुलेट घसरून ते रस्त्यावर फेकले गेले. त्यात त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच वाहतूक पोलीस प्रकाश गवस, सुनील निकम यांनी घटनास्थळी धाव घेतली. दिगंबर यांचा मृतदेह रुग्णवाहिकेतून शवविच्छेदनासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. अपघाताची खबर रुपेश अरुण पारकर यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. याबाबत अधिक तपास कणकवली पोलीस करत आहेत. दिगंबर केसरकर यांचा सिलिका मायनिंगचा व्यवसाय आहे. त्यांना दोन मुलगे आहेत. दिगंबर यांच्या अपघाती मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Related Stories

नवे 66 कोरोनाबाधित, मृत्यूदराची चिंता कायम

Omkar B

आचरा ग्रामपंचायत तर्फे सेवानिवृत्त सैनिकांचा गौरव

Anuja Kudatarkar

नीट परीक्षेला जाणे होणार सोपे

NIKHIL_N

बोलेरो पिकअपने शेळय़ांच्या कळपाला चिरडले

NIKHIL_N

रिफायनरीसाठी राजापूर हा एकमेव पर्याय

Patil_p

दोडामार्गातील महिला मासे विक्रेतीला वेंगुर्ल्यात धमकी

NIKHIL_N