Tarun Bharat

कासावलीच्या नुतन हॉस्पिटल प्रकल्पाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

Advertisements

वार्ताहर /झुआरीनगर

कासावलीच्या नूतन हॉस्पिटल प्रकल्पाचे रविवारी संध्याकाळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, गोवा राज्य साधनसुविधा विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आमदार जोशुला डिसोजा,     स्थानिक आमदार एलिना साल्ढाना उपस्थित होत्या. एकूण 36 खाटांचे हे हॉस्पिटल 16 कोटी रूपये खर्चून उभारण्यात आलेले असून चार वर्षांनी या हॉस्पिटलचे काम पूर्ण झाले. कोरोनाच्या दुसऱया लाटेत रूग्णांच्या सेवेसाठी दोन महिने या हॉस्पिटलचा वापर करण्यात आला होता. त्यानंतर काल रविवारी या हॉस्पिटलचे अधिकृतरीत्या उद्घाटन करण्यात आले.

   या समारंभाच्या व्यासपीठावर आरोग्य संचालक डॉ. जुझे डिसा, आरोग्य खात्याचे अन्य वरीष्ठ डॉक्टर्स तसेच कासावलीचे सरपंच फॅर्वीन साल्ढाना, कुठ्ठाळीच्या सरपंच सानिया परेरा उपस्थित होत्या. कासावलीचे नुतन हॉस्पिटल सर्व सोयीसुविधांनी सज्ज असून यात एकूण 36 खाटांची सोय आहे. विविध प्रकारच्या सात ओपीडी, कॅजुअल्टी, अल्ट्रा साऊण्ड कक्ष, मेमोग्राफी, एक्स रे, डालेसीस विभाग, ऑपरेशन थिएटर, कामगारांसाठी कक्ष, आयसीयू, महिला, पुरूष व मुलांसाठी स्वातंत्र विभाग तसेच अन्य विविध आवश्यक सुविधा या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

जनतेच्या आरोग्याची चिंता असल्यानेच आरोग्य सेवा उपलब्ध- डॉ. प्रमोद सावंत

   मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी उद्घाटनानंतर बोलताना ख्रि. माथानी साल्ढाना यांचे स्वप्न या हॉस्पिटलच्या उद्घाटनाने साकार झाल्याचे मत व्यक्त केले. हे हॉस्पिटल पूर्णत्वास येण्यामागे आमदार एलिना साल्ढाना यांचेही कष्ट असून त्यांनी समर्पीत भावनेने या हॉस्पिटलसाठी झोकून दिले होते असे मुख्यमंत्री म्हणाले. सरकारला लोकांची चिंता असल्यानेच सरकार अशा सुविधा उपलब्ध करीत असून कोविड काळातही सरकारने कोणताही भेदभाव न करता लोकांना विविध प्रकारे मदत केलेली आहे. कोविड काळात कोणत्याही राज्याने दिलेले नाहीत असे उपचार गोवा सरकारने मोफत उपलब्ध केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. राज्य सरकार गोव्यात शंभर वर्षांचा काळ नजरेसमोर ठेवून मोठमोठे प्रकल्प राबवीत आहे. बरेच युवक रोजगारासाठी देशाबाहेर व राज्याबाहेर जातात. त्यांना इथेच संधी मिळवून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. आत्मनिर्भर भारत आणि स्वंयपूर्ण गोवा राज्याच्या दिशेने सरकार पावले टाकीत आहे. जनतेने सरकारला योग्य सहकार्य करायला हवे असे मुख्यमंत्री म्हणाले.

ऑक्टोबरमध्ये कॅन्सर हॉस्पिटलसाठी पायाभरणी- विश्वजीत राणे

 आरोग्मंत्री विश्वजीत राणे यांनी यावेळी बोलताना राज्य सरकार आता गावागावातही चांगल्या दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध करीत आहे. जनतेला चांगल्या सुविधा पुरवण्यास सरकार कटीबध्द आहे. मुख्यमंत्र्यांचे पूर्ण सहकार्य मिळत आहे. कोविड काळात आपल्या जनतेला चांगली सेवा देण्यास अमेरीका कमी पडली. मात्र, भारतात जनतेला चांगली सेवा मिळाली असे स्पष्ट करून ऑक्टोबरमध्ये गोव्यात कॅन्सर हॉस्पिटलसाठी पायाभरणी करणार असल्याचे आरोग्यमंत्री म्हणाले.

आमदार एलिना साल्ढाना यांनी हॉस्पिटलच्या उद्घाटनाबद्दल समाधान व्यक्त करताना आजचा दिवस सर्वाचे आभार व्यक्त करण्याचे असल्याचे नमूद केले. माथानी साल्ढानांचे स्वप्न साकार झालेले आहे. मनोहर पर्रीकर यांनी या हॉस्पिटलची पायाभरणी केली होती असे सांगून त्यांनी मनोहर पर्रीकरांची आठवण काढली.

Related Stories

गोमंतक बहुजन महासंघाचा सुदिन ढवळीकरांना विरोध

Amit Kulkarni

फोंडय़ातील बुधवारपेठ पूर्ण लॉकडाऊन

Patil_p

गोवा अर्बनचे संचालक मंडळ बिनविरोध

Amit Kulkarni

इंधन दरवाढी विरोधात काँग्रेसची निदर्शने

Omkar B

आमदार अपात्रता प्रकरणी सभापतींची 5 रोजी सुनावणी

Amit Kulkarni

महाविद्यालयांच्या परीक्षा रद्द

Omkar B
error: Content is protected !!