Tarun Bharat

कास जलवाहिनीच्या गळतीचे काम काही अंशी पूर्ण

प्रतिनिधी/ सातारा

सातारा शहराला पाणी पुरवठा करणाऱया कास जलवाहिनीच्या बंदिस्त पाटाला कासाणी गावच्या हद्दीत तीन ठिकाणी गळती लागली आहे. त्या गळतीच्या ठिकाणची दुरुस्ती करण्यासाठी सातारा पालिकेच्यावतीने आज कामाला प्रारंभ करण्यात आला आहे. काही अंशी हे काम पुर्ण करण्यात आले आहे. या कामाची पाहणी पाणी पुरवठा सभापती सीता हादगे यांनी केली. कामगारांना सुचना दिल्या.

कास धरणाद्वारे शहराला पाणी पुरवठा होणाऱया पाइं&पलाईनला तीन ठिकाणी गळती लागली असल्याची बाब पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या निदर्शनास येताच पाणी पुरवठा विभागाने ही दुरुस्ती करण्याचे काम हाती घेतले आहे. त्या कामाकरता शहराच्या काही भागाला कमी दाबाने तर काही भागाचा पाणी पुरवठा बंद होता. दुरुस्तीचे काम हाती घेतल्यानंतर सोमवारी पालिकेच्या पाणी पुरवठा सभापती सीता हादगे यांनी दुरुस्तीच्या ठिकाणी जावून कामाची पाहणी केली. तब्बल सहा तास दुरुस्तीचे काम सुरु होते. त्यावेळी पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी संदीप सावंत, सोमनाथ बादापुरे आदी उपस्थित होते. 12 कर्मचाऱयांनी हे काम करवून घेतले.

Related Stories

सातारा : शासकीय अधिकारीचं होणार प्रशासक

Archana Banage

सातारा: १५० जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह तर ४ जणांचे नमुने पाठविले तपासणीला

Archana Banage

१८ तारखेनंतर भूमिका मांडणार- राजू शेट्टी

Archana Banage

अपघाताच्या कारणावरुन राजाळेतील एकाचे अपहरण

Patil_p

महाविकास आघाडी सरकार अल्पमतात : नारायण राणे

Archana Banage

Satara : कोयना परिसरामध्ये भूकंपाचा सौम्य धक्का

Abhijeet Khandekar