Tarun Bharat

कास जलवाहिनीला प्रकृती रिसॉर्टजवळ गळती

Advertisements

प्रतिनिधी/ सातारा

शहराला पाणी पुरवठा करणारी सगळय़ात जुनी वितरण व्यवस्था म्हणजे कास उदभव योजना. याच योजनेच्या जलवाहिनीला कास धरण ते सातारा बोगदा या रस्ता रुंदीकरणाच्या कामामध्ये प्रकृती रिसॉर्टच्या मागे जलवाहिनीला गळती लागली आहे. याची माहिती मिळताच पाणी पुरवठा सभापती सीता हादगे यांनी आज सकाळी जावून पाहणी केली. त्याबाबत दुरुस्तीच्या सुचना त्यांनी दिल्या.

कास धरण ते सातारा बोगदा अखेर रस्ता रुंदीकरणाचे काम चालू आहे. त्या रुंदीकरणाच्या कामांमध्ये सातारा शहरात कास धरणाच्या माध्यमातून होणाऱया पाणीपुरवठा पाईप लाईनला गणेश खिंड तेथे तसेच रस्ता रुंदीकरण पावर हाऊस  आणि प्रकृती हॉटेलच्या पाठीमागे गळती लागली आहे. या लागलेल्या गळतीची पाहणी सभापती सीता हादगे यांनी करून ती गळती काढण्याच्या सक्त सूचना उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नगरपालिका पाणीपुरवठा विभागास केल्या. त्यांच्या सूचनेनुसार गळत्या काढण्याचे काम पाणीपुरवठा विभागाने युद्धपातळीवर हाती घेतले आहे. त्या कामाची पाहणी करताना पाणीपुरवठा सभापती सौ सीता हादगे आणि संदीप सावंत, ठेकेदार संजय जाधव, सोमनाथ पाटोळे यांनी सुरु केल आहे.   हे काम नगर अभियंता दिलीप चिद्रे., पाणी पुरवठा अभियंता सुधीर चव्हाण, दिग्विजय गाढवे यांच्या मार्गदर्शनानुसार चालू आहे. हे काम पूर्ण करण्यास किमान चार ते पाच दिवस लागणार आहेत. गळतीच्या माध्यमातून होणारा पाण्याचा  अपव्यय टाळला जाणार आहे. तरी नागरिकांना पाण्याचा अपव्यय टाळावा  पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवहन सीता हादगे यांनी केले आहे.

Related Stories

अँकर कोरोनाविरुध्द एकजुटीने लढा द्या

Patil_p

सावधान : सातारा जिल्ह्यात बाधितांचा आकडा वाढतोय

Archana Banage

सर्वोच्च न्यायालयाचा ठाकरे सरकारला दणका, बहुमत चाचणीला स्थगिती देऊ शकत नाही, वाचा सुरवातीपासून ते शेवटपर्यंत

Rahul Gadkar

राज्यपाल राजकारण करत असल्याच्या सरकारच्या आरोपावर भगतसिंह कोश्यारी म्हणाले…

Archana Banage

ST कर्मचाऱ्यांचे तिन्ही महिन्याचे पगार दिवाळीपूर्वी होणार : अनिल परब

Tousif Mujawar

पुन्हा बायोमायंनिग प्रकल्प वादाच्या भोवऱयात

Patil_p
error: Content is protected !!