वार्ताहर / कास


गेल्या काही दिवसांपासुन पावसाच्या पडणाया हलक्या सरी व बुधवारी मध्यरात्री पासुन पडणाया मुसळधार पावसामुळे सातारा शहराला पाणी पुरवठा करणारा कास तलाव गुरूवारी दुपारी ओव्हरफ्लो होऊन पाणी सांडव्यावरून वाहु लागले आहे
सातारा शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता शहराला मोठया प्रमाणात मुबलक पाणी साठा उपलब्ध होण्यासाठी गेल्या तिन वर्षापासुन कास तलावच्या भिंतीची उंची वाढविण्याचे काम प्रगतीपथावर सुरू असुन ते यावर्षी पुर्ण न झाल्याने धरणाची पाणी साठवण क्षमता जैसे थेच ठेवली आहे मध्यरात्रीपासुन पडणाया मुसळधार पावसामुळे तलावच्या पाणी पातळीत झपाटय़ाने वाढ होऊन गुरूवारी दुपारी धरण ओव्हरप्लो झाले सांडव्यावरुन पाणी वाहु लागल्याने सातारकारांच्या पुढील वर्षाच्या पाणी साठयाची चिंता मिटली आहे