Tarun Bharat

काही चांगलंही घडतंय…

अचूक बातमी “तरुण भारत”ची, शुक्रवार, 14 मे, 2021

म्हणे जयडी, ‘किया योगा, कोरोना भागा’

सातारा / प्रतिनिधी : 

‘लागिर झालं जी’ या मालिकेत काम केलेली अभिनेत्री साया काशिद. मुळची काशिळची. मुंबईत चित्रीकरणानिमित्त व्यस्त होती. आई आणि बहिणीसह ती मुंबईलाच होती. परंतु कोरोनाची साथ वाढू लागताच सातारा गाठला. तत्पूर्वी तिला थोडा ताप येवून गेला होता. तिच्या आईला शुगरचा त्रास असल्याने कोरोनाची भिती नको म्हणून साताऱयात तपासणी केली. तेव्हा एचआरटीसीचा स्कोर 6 दाखवला.  दोघी बहिणींनी आईची खूप काळजी घेत स्वतःसह आईला घरीच होम आयसोलेशनमध्ये राहून ठणठणीत बरे केले. रोजचा रोज योगा आणि उत्तम आहार शाकाहार या सुत्राचे आचरण केले.  

कोरोनाचा विषाणू खूप भयंकर आहे. हे ऐकून सगळय़ांच्याच काळजाचे पाणी पाणी होते. तर ज्यांच्या घरात कर्ती म्हणून लेकच सारे काही पहाते त्या घरात कोरोनाची एन्ट्री झाली तर करायचं कसे असा प्रश्न असतो. साताऱयातील साया काशिद यांनी अनेक मालिकांमध्ये काम केलेले आहे. ब्रेक द चैन अंतर्गत लॉकडाऊन लागण्यापूर्वी एप्रिलमध्ये त्यांना थोडा ताप आला. गोळय़ा घेतल्यानंतर तो गेला. परंतु त्यांची आई वंदना यांना शुगरचा त्रास असल्याने त्रास होवू नये म्हणून त्या तिघी साताऱयात राहिल्या. साताऱयात आल्यानंतर आईची एचआरटीसी टेस्ट केली. त्यात 6 इतका स्कोअर आला तर आरटीपीसीआर टेस्ट केली त्यात निगेटीव्ह रिपोर्ट आला असला तरी डॉक्टरांनी दिलेल्या सल्यानुसार औषधे गोळय़ा सुरु ठेवल्या. साया हिला योगा आणि व्यायामाची आवड असल्याने ती आईला योगाचे धडे देवू लागली. आईच्या आहारात शुद्ध शाकाहार कसा येईल याची काळजी घेत राहिली. त्यामुळे आपोआप वातावरण घरातील प्रफुल्लीत बनले. अन् दोघी बहिणींनी 54 वर्षाच्या आईला खडखडीत बरे केले. त्याबाबत त्या संदेश देताना म्हणाल्या, लक्षणे आढळून आल्यास अंगावर काढू नका. पहिला आठवडा आपल्या हातात. दुसरा आठवडा डॉक्टरांच्या हातात अन् तिसरा आठवडा देवाच्या हातात असतो. प्रत्येकाची इम्युनिटी पॉवर सारखी नसते. स्वत:वरती प्रेम करा. 

Related Stories

शंभूराज यांचे अभियान थकना मना है…!

Archana Banage

हद्दवाढ झाली अन् कोरोनातही जागेचे भाव वाढण्याची शक्यता

Omkar B

ठोसेघर पठार भागातील बत्ती गुल

Patil_p

रस्त्यांच्या कामासाठी पाच कोटी निधी मंजूर

Patil_p

पदवी अंतिम सत्राच्या परीक्षा पुन्हा लांबणीवर

Archana Banage

सात महिन्यानंतर हॉटेल-रेस्टॉरंट सेवेत

Patil_p