बेळगाव : केएलई अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन ऍण्ड रिसर्चतर्फे (काहेर) विद्यापीठाच्या आवारात पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विवेक सावजी, कुलसचिव डॉ. व्ही. ए. कोठिवाले यांच्या हस्ते विविध उपयोगी रोपे लावण्यात आली. कुलगुरुंनी विद्यार्थ्यांना आणि एनएसएस अधिकाऱयांना रोपांची काळजी घेण्याचे आवाहन केले. प्रत्येकानेच एक झाड लावून हिरवाई निर्माण करावी, असेही ते म्हणाले. याप्रसंगी प्राध्यापक, विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते.


previous post