Tarun Bharat

काहेरतर्फे महात्मा गांधी अध्ययन केंद्राचा शुधारंभ

प्रतिनिधी/ बेळगाव

केएलई अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन ऍण्ड रिसर्च, एनएसएस विभाग यांच्यावतीने महात्मा गांधी यांच्या 151 व्या जयंतीनिमित्त जेएनएमसीच्या आवारात महात्मा गांधी अध्ययन केंद्र सुरू करण्यात आले. डॉ. एस. जी. देसाई सेंट्रल लायब्ररीमध्ये हे केंद्र सुरू करण्यात आले. यावेळी महात्मा गांधी यांच्या पुतळय़ाचे अनावरणही करण्यात आले. कुलसचिव डॉ. व्ही. ए. कोठीवाले यांनी स्वागत केले.

यावेळी कुलगुरु डॉ. विवेक सावजी म्हणाले, गांधीजी हे अत्यंत प्रभावी व्यक्तिमत्त्व होते. त्यांचा भारतीयांवर विलक्षण प्रभाव होता. सत्य आणि अहिंसा या त्यांच्या तत्त्वांचा आपण अंगीकार केला पाहिजे.

यावेळी उपकुलसचिव डॉ. एम. एस. गणाचारी यांनी अहिंसेची शपथ देवविली.  केएलई स्कूल ऑफ म्युझिकच्यावतीने गांधींची भजने सादर करण्यात आली. डॉ. सैद यांनी सूत्रसंचालन केले. एनएसएस समन्वयिका डॉ. अश्विनी नरसण्णावर यांनी आभार मानले. यावेळी डॉ. एच. बी. राजशेखर, डॉ. अलका काळे, डॉ. आर. एस. मुधोळ, डॉ. सुधा रेड्डी, डॉ. संजीवकुमार, डॉ. सुनील जलालपुरे, डॉ. व्ही. एम. पट्टणशेट्टी आदी उपस्थित होते.

Related Stories

बाजारात सुक्यामेव्याचे आकर्षण

Omkar B

बिपीन रावत-आर.हरिकुमार यांची सी-बर्ड नाविक दलाला भेट

Amit Kulkarni

पहिला पेपर : 430 विद्यार्थ्यांची दांडी

Amit Kulkarni

बसवण कुडचीत आज मरगाईदेवी मूर्तीची मिरवणूक

Patil_p

दादर-हुबळी रेल्वेसाठी वेटिंग 300 वर

Omkar B

अनगोळ-वडगाव रस्ता रुंदीकरण काम युद्धपातळीवर

Amit Kulkarni
error: Content is protected !!