Tarun Bharat

काेल्हापूर : उचगाव येथे महिला कोरोना पॉझिटिव्ह

प्रतिनिधी / उचगाव

उचगाव (ता.करवीर) येथील मुख्य रस्त्यावर गावभागात एक पंचेचाळीस वर्षीय महिलेचा कोरोना अहवाल बुधवारी पॉझिटिव्ह आला. उचगाव मुख्य रस्ता सील करण्यात आला आहे. सलग तिसऱ्या दिवशी उचगांवात कोरोनाचा रुग्ण आढळल्याने परिसरात भितीचे वातावरण आहे.त्यामुळे उचगावात कोरोना पॉझिटिव्ह संख्या पाच झाली आहे.उचगांव रविवार पर्यंत संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आले आहे.

पंचेचाळीस वर्षीय महिला राजारामपुरी येथील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये काम करीत होते.त्या दवाखान्यात एक जण पॉझिटिव्ह आल्यानंतर या महिलेचा स्वॅब घेण्यात आला होता. बुधवारी सकाळी त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर उचगांवात खळबळ उडाली.या रुग्णाच्या संपर्कातील नातेवाईक व इतर व्यक्तींना पुढील तपासणीसाठी सीपीआर येथे तपासणीसाठी नेण्यात आले. उचगावात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या पाच झाली आहे.

उचगाव मुख्य रस्ता बॅरिकेट लावून ग्रामपंचायती ने बंद केला आहे. तसेच सर्व परिसर निर्जंतुकीकरण करण्यात आला आहे.सरपंच मालुताई काळे, गणेश काळे, उपसरपंच मनीषा गाताडे, तलाठी महेश सूर्यवंशी, ग्रामविकास अधिकारी अजित राणे, पोलिस पाटील स्वप्निल साठे, ग्रामपंचायत सदस्य संगिता अनिल दळवी, विनायक जाधव, मधुकर चव्हाण, रमेश वाईंगडे, रवी काळे, पैलवान मधुकर चव्हाण, अनिल दळवी, नामदेव वाईंगडे व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी परिसर सील करुन निर्जंतुकीकरण केला.

Advertisements

Related Stories

कोल्हापूर शहरातील मुख्य मटण मार्केट राहणार बंद, जिल्ह्यात इतरत्र सुरूच राहणार

Abhijeet Shinde

एका अनुमानिताचा रिपोर्ट आला निगेटिव्ह; 113 विलगीकरण कक्षात

Abhijeet Shinde

कोल्हापूर : केके गँगचा म्होरक्या कांबळेसह तिघांना पोलीस कोठडी

Abhijeet Shinde

वैराग येथील वाहन चालकांवर उपास मारीची वेळ, मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मदतीची मागणी

Abhijeet Shinde

कोरोना : आज काहीसा चिंतामुक्त… दुहेरी दडपणाचा भार हलका : जयंत पाटील

Abhijeet Shinde

दहावी परीक्षेला उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश देवू नये

Sumit Tambekar
error: Content is protected !!