Tarun Bharat

किटवाडचा धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहित

परतीच्या पावसाचा जोर, सुट्टी दिवशी पर्यटकांची गर्दी

प्रतिनिधी /बेळगाव

आठभरापासून सुरु असलेल्या परतीच्या पावसामुळे किटवाड (ता. चंदगड) येथील धबधबा पुन्हा एकदा पूर्ण क्षमतेने प्रवाहीत झाला आहे. जूलै-ऑगस्ट महिन्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पर्यटकांना बंदी होती. मात्र आता काही प्रमाणात शिथिलता दिल्याने सुट्टीच्या दिवशी धबधब्यावर पर्यटकांची वर्दळ वाढत आहे.

अलिकडच्या काही वर्षात हा धबधबा नावारूपाला आलेला हा धबधबा बेळगावपासून साधारण 20 किलो मिटर अंतरावर आहे. परिसरातील हिरवाई, शुभ्रधवल फेसाची उधळण करणारा धबधबा परतीच्या पावसामुळे ऑक्टोबरमध्येही पर्यटकांची वर्दळ वाढत आहे.

या ठिकाणी असलेला निसर्गरम्य परिसर, तुडुंब भरलेला जलाशय आणि आजू-बाजूला असलेली हिरवीगार शेती पर्यटकांना मोह घालत आहे. त्य़ामुळे सुट्टीच्या दिवशी गर्दी वाढत आहे. जलाशयाच्या झिगझ्यागवरून प्रवाहित होऊन कोसळणारा हा धबधबा मुख्य ठिकाणी साधारण 30 ते 40 फुटावरून कोसळतो. आजू-बाजूच्या परिसरासह बेळगाव तालुक्मयातील पर्यटकांची गर्दी वाढत आहे. मात्र मागील दोन वर्षात कोरोनामुळे पर्यटकांना वर्षा पर्यटना आनंद लुटता आली नाही. मात्र आता काही प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शिथिलता देण्यात आली आहे. त्यामुळे पर्यटकांची संख्या वाढत आहे. मागील आठवडय़ाभरापासून परतीच्या  पावसाने धबधबा पुन्हा एकदा पूर्ण क्षमतेने प्रवाहीत झाला आहे. त्यामुळे धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची पावले वळताना दिसत आहेत.

Related Stories

कचरा व्यवस्थापन कार्यशाळेचा समारोप

Omkar B

आर.एम.रेणके यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार

Amit Kulkarni

टिळकवाडीत आणखी दोन उड्डाणपूल होणार

Patil_p

नेहरूनगर येथे चार दुचाकी पेटविल्या

Amit Kulkarni

महानगरपालिकेचे दरवाजे नागरिकांसाठी बंद!

Tousif Mujawar

खानापूर तालुक्यात शनिवारी १० नव्या कोरोना बाधितांची नोंद

Tousif Mujawar