Tarun Bharat

किणयेनजीक ट्रकमधील साहित्याची चोरी

बुधवारी मध्यरात्री घडला प्रकार, ताडपत्री कापून केली चोरी

प्रतिनिधी / बेळगाव

बेळगावहून गोव्याला जाणाऱया ट्रकवरील ताडपत्री कापून ट्रकमधील साहित्य चोरणाऱया टोळीने किणये जवळ बुधवारी मध्यरात्री हैदोस घातला. दोन ट्रकवरील ताडपत्री कापून साहित्य चोरल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

बेळगावहून जाणाऱया दोन ट्रकवरील ताडपत्री कापून चोरी करण्यात आली आहे. एका ट्रकमध्ये इलेक्ट्रीक साहित्य होते. होल्डर, स्वीच आदी साहित्यांचे बॉक्स चोरटय़ांनी पळविले आहेत. बुधवारी मध्यरात्री 1.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.

यापूर्वी सुतगट्टी घाटात ट्रकची दोरी कापून चोरी करणाऱया टोळय़ा सक्रिय होत्या. राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणानंतर या टोळय़ांचे कारणामे पूर्णपणे थांबले होते. आता किणये परिसरात एक मोठी टोळी कार्यरत असून पोलिसांनी त्यांच्या मुसक्मया आवळण्याची मागणी करण्यात येत आहे. गुरुवारी रात्रीपर्यंत यासंबंधी बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात फिर्याद दाखल झाली नव्हती.

Related Stories

खासगी अनुदानित शाळा-कॉलेज शिक्षकांचे मंगळवारी आंदोलन

Patil_p

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन यशस्वी

Amit Kulkarni

स्केटिंगपटू देवण बामणेचा आयुर जिमतर्फे गौरव

Amit Kulkarni

धर्मस्थळ ग्राम अभिवृद्धीतर्फे दिव्यांगांना व्हीलचेअर

Amit Kulkarni

खानापूर तालुक्यात शिक्षक दिन साजरा

Amit Kulkarni

आमची जमीन घ्याल तर तुम्हाला पाप लागेल

Patil_p