Tarun Bharat

किणये जवळ गोवा बनावटीची दारु जप्त

अबकारी विभागाची कारवाई, चंदगड तालुक्यातील युवकाला अटक

 प्रतिनिधी / बेळगाव

कारमधून गोवा बनावटीची दारु वाहतूक करणार्‍या चंदगड तालुक्यातील एका युवकाला अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी अबकारी अधिकार्‍यांनी किणयेजवळ हि कारवाई केली आहे. त्याच्या जवळून कारसह दारुसाठा जप्त करण्यात आले आहे.

अबकारी विभागाचे संयुक्त आयुक्त वाय. मंजुनाथ व अधिक्षक बसवराज संदीगवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आर. बी. होसळळी व त्यांच्या सहकार्‍यांनी हि कारवाई केली आहे. बाळू सुभाणी नायक

(वय 35, रा. सोनारवाडी, ता. चंदगड) असे अटक करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे.

एम. एच. 06 एबी 7453 क्रमांकाच्या स्वीप्ट कारमधून बेकायदा दारु वाहतूक करताना बाळूला अटक झाली आहे. त्याच्या जवळून 26 लीटर दारु, बारा लीटर बिअर जप्त करण्यात आले आहे. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी करुन त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे.

Related Stories

परिवहन तोटय़ात …बससेवा सुरूच

Patil_p

बेडकिहाळच्या ऐतिहासिक दसरा महोत्सवावर कोरोनाचे संकट

Patil_p

मनपा निवडणूक अद्याप लांबणीवर

Patil_p

विकेंड लॉकडाऊनच्या अंमलबजावणीला सुरूवात

Amit Kulkarni

शेट्टी स्मृती चषक स्पर्धेसाठी मनिष ठक्कर, परशुराम पाटील सहावे प्रँचायझी

Amit Kulkarni

कोरोनाः कर्नाटकात बुधवारी ७,८८३ नवीन रुग्ण

Archana Banage