Tarun Bharat

किणी टोल नाक्यावरील पोलीस कर्मचाऱ्यांच्या कामाचे पोलीस प्रमुखांनी केले कौतुक

प्रतिनिधी / पेठ वडगाव

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर किणी परिसरात गुरुवारी झालेल्या वादळी वारा व पाऊस यामुळे उद्ध्वस्त झालेला किणी टोल नाका येथील व कणेगाव येथे उभारण्यात आलेला तपासणी नाका प्रशासनाच्या जोरदार प्रयत्नामुळे अवघ्या १२ तासात दुप्पट क्षमतेने सुरु झाला आहे. प्रसंगवधान दाखवत पोलिसांनी जिल्ह्यात ही वाहने विना नोंदणी येवून कोरोनाचा संसर्ग होईल ही बाब लक्षात घेवून प्रसंगवधान दाखवत कोल्हापूर जिल्ह्याच्या सुरक्षेसाठी तत्काळ विस्कळीत झालेली सर्व नोंदणीची सूत्रे हातात घेवून टोकन यंत्रणा सुरु केली. या कामाबद्दल जिल्हा पोलीस प्रमुख अभिनव देशमुख यांनी पोलीस निरीक्षक प्रदीप काळे यांचेसह अन्य अधिकारी व पोलीस कर्मचार्यांचे विशेष कौतुक करून त्यांना चांगल्या कामगिरीबद्दल खात्यांतर्गत बक्षीस जाहीर केले आहे. पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे या कामगिरीबद्दल नागरीकातून कौतुक होत आहे.
गुरुवारी सायंकाळी किणी परिसरात झालेल्या वादळी वारा व पावसात पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील कणेगांव (जि.सांगली) व किणी टोल नाक्यावर राज्य भरातून कोल्हापूर मध्ये येणाऱ्या प्रवाशांना नोंदणी व कोणत्या दवाखान्यात तपासणी करण्याची आहे. याबाबत टोकन देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून उभारण्यात आलेला तपासणी नाका पूर्णता उद्ध्वस्त झाला. या ठिकाणी काम करणारे पोलिस व इतर कर्मचारी जखमीही झाले.वादळी वाऱ्यात जिल्हा प्रशासनाची तपासणी नाका व सर्व यंत्रणा बंद पडली. येथील कर्मचारी ही जखमी झाले तर उर्वरीत कर्मचारी या आस्मानी संकटाने भेदरले होते.

       
रस्त्यावर मुंबई,पुणे या बाधित भागातून आलेले चारचाकी वाहने होती यातील काही वाहने वादळी पावसाचा फायदा घेवून निघून गेली. मुंबई, पुण्याहून आलेल्या वाहनातून कोणी परस्पर घरी गेल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढेल याचे गांभीर्य ओळखून वादळी पावसातही वडगांव पोलिस ठाणेचे पोलीस निरीक्षक प्रदीप काळे यांनी तात्काळ टोल नाक्यावरील दोन बूथ ताब्यात घेवून येणार्या प्रत्येक वाहणाची तपासणी त्यांचे प्रवेशपत्र पडताळणी व त्यांना हस्तलिखित टोकण देत शिस्त लावणेचे काम आपल्या सहकार्यासह सुरु केले. वडगांव पोलिसांनी सकाळी प्रशासनाची यंत्रणा येईपर्यंत बंदोबस्त व तपासणी टोकण असे काम चोख बजावले.
पोलीस प्रशासनाने तत्परता दाखवत प्रसंगावधान राखत केलेल्या कामाची दखल घेवून जिल्हा पोलीस प्रमुख अभिनव देशमुख यांनी या पोलीस कर्मचार्यांचे कौतुक करून पोलीस निरीक्षक प्रदीप काळे, पोलीस निरीक्षक अंबरुपी फडतरे, पोलीस निरीक्षक कोळेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार, पीएसआय अर्चना पाटील यांचेसह ३८ पोलीस कर्मचारी, होमगार्ड यांच्या चांगल्या कामाची दखल घेवून त्यांना पोलीस खात्याचे बक्षीस जाहीर केले. पोलीस प्रशासनाने केलेल्या या कामाबद्दल नागरीकातून पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या कामाचे कौतुक होत आहे.

Related Stories

कोल्हापूर : कुंभोज येथील शेती व घरांचे पंचनामे शासकीय नियमानुसार करण्याची मागणी

Archana Banage

राज्य आपलं आहे, संप मागे घ्या; देवेंद्र फडणवीसांचे आवाहन

Archana Banage

कोल्हापूरात ४९० कोरोनाबाधित, २७ जणांचा मृत्यू

Archana Banage

कोल्हापूर : वारणा साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब जाधव यांचे निधन

Archana Banage

पाटगांव धरण ४६ टक्के तर कोंडूशी लघुप्रकल्प १०० टक्के पाणीसाठा

Archana Banage

कोल्हापूर : नगरचना विभागाचे सहाय्यक संचालक आर. एस. महाजन यांचा स्वेच्छा निवृत्तीसाठी अर्ज

Archana Banage