Tarun Bharat

किमान वेतन लागू करा

Advertisements

दिव्यांगांनी दिले जिल्हाधिकाऱयांना निवेदन

प्रतिनिधी / बेळगाव

ग्रामीण पुनर्वसती, नगरपुनर्वसती या विभागात दिव्यांगांची नेमणूक केली जाते. ग्राम पंचायतीच्या माध्यमातून तसेच नगरपंचायत आणि नगरपालिका यांच्या माध्यमातून जी कामे केली जातात ती कामे दिव्यांग घरापर्यंत जाऊन करत आहेत. मात्र, देण्यात येणारे वेतन तुटपुंजे असून आम्हाला किमान वेतन द्यावे, अशी मागणी दिव्यांगांनी जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

  जिह्यात 6 हजार 22 विकलांग व्यक्ती या माध्यमातून काम करत आहेत. ग्रामीण भागामध्ये अनेक जण काम करत आहेत. ग्रा. पं. मध्ये 613 जण, ता. पं. मध्ये 176 जणांसह इतर ठिकाणी या दिव्यांग व्यक्ती कार्यरत आहेत. सध्या ग्रामीण भागातील दिव्यांगांना 6 हजार रुपये तर शहरी भागात काम करणाऱयांना 12 हजार रुपये गौरवधन देण्यात येत आहे. त्यामुळे या महागाईमध्ये जीवन जगणे कठीण बनले आहे.

  किमान वेतन द्यावे, तसेच ग्राम पंचायतीमध्ये नियमानुसार बढती द्यावी, अशी मागणीही केली आहे. कोरोना वॉरियर्स म्हणून दिव्यांगांनाही प्रोत्साहन धन द्यावे, अशी मागणीही केली आहे. देण्यात येणारे वेतन वेळेत द्यावे तसेच भत्तादेखील द्यावा, पगारी रजा द्यावी आदीसह इतर मागण्या केल्या आहेत. यावेळी किरण इळगेर, फकीरगौडा पाटील यांच्यासह दिव्यांग उपस्थित होते. 

Related Stories

नंदगड येथील प्री-गुड फ्रायडे प्रार्थनेत यात्रेकरू सहभागी

Amit Kulkarni

जादा पाणी उपशाकरिता पंप बसविण्याचे काम अंतिम टप्यात

Patil_p

राष्ट्रीय ज्युडो स्पर्धेत मलप्रभा जाधवला कांस्यपदक

Amit Kulkarni

जिल्हय़ात मंगळवारी 12 जण कोरोना बाधित

Patil_p

महिला आघाडीतर्फे जिजाऊ जयंतीनिमित्त माधुरी जाधव यांचा सत्कार

Patil_p

कचरा उचल करण्यासाठी घरोघरी जाणार ई-ऑटो टिप्पर

Patil_p
error: Content is protected !!