Tarun Bharat

कियाराचे फॅशन सेन्स

कियारा अडवाणी ही बॉलिवूडमधली वलयांकित अभिनेत्री. ‘एम.एस. धोनी द अनटोल्ड स्टोरी’, ‘कबीर सिंह’सारख्या चित्रपटांमध्ये झळकलेली कियारा फॅशनेबल आहे. तिने नेहमीच आपला फॅशन सेन्स जपला आहे.

कियारा अडवाणी… बॉलिवूडमधली हॉट आणि ग्लॅमरस अशी अभिनेत्री. कियाराच्या फॅशनची नेहमीच चर्चा होत असते.   कियाराचा वॉर्डरोब नेहमीच अपटूडेट असतो. तिचे पेहराव खूपच आकर्षक असतात. मध्यंतरी कियाराने पांढर्या रंगाचा स्टायलिश ड्रेस कॅरी केला होता. तिने त्यावर डेनिम जॅकेट घातलं होतं. यात ती खूप सुंदर दिसत होती. न्यूड रंगाचे हिल्सही शोभून दिसत होते. कियाराने सोनेरी रंगांची पर्स कॅरी केली होती. अशाच एका प्रसंगी कियाराने फ्लोरल प्रिंटवाला ऑफ शोल्डर ड्रेस कॅरी केला होता. तिने या ड्रेसवर काळ्या रंगाचा जाड बेल्ट लावला होता. तिने केस मोकळेच सोडले होते. तसंच पॉईंटेड हिल्समुळे तिचं व्यक्तिमत्त्व खुललं होतं. कियारा प्रयोग करायला कधीच घाबरत नाही. तिने ब्राउन रंगाच्या हाय वेस्ट पँटवर निऑन ग्रीन टँक टॉप घातल होता. यावर तिने हूप स्टाईल कानातले घातले होते. या पेहरावात कियारा खूपच सुंदर दिसत होती. कियाराने पोलका डॉट्सवाला काळ्या रंगाचा ड्रेस घातला होता. यासोबत तिने वेस्ट बॅग कॅरी केली होती. तिला टी शर्ट खूप आवडतात. कॅज्युअल लूकसाठी ती टी शर्ट घालते. अलिकडेच तिने स्लोगनवाला टी शर्ट घातला होता. असे टी शर्ट जीन्स, शॉर्ट, स्कर्ट यापैकी कशावरही कॅरी करता येतात. कियाराने घातलेला स्लोगन टी शर्ट पांढर्या रंगाचा होता. यासोबतच तिने झगमगीत स्कर्ट कॅरी केला होता. तिच्या चंदेरी रंगाच्या स्कर्टवर पांढरा टी शर्ट शोभून दिसत होता. तिने लाल रंगाची स्लिंग बॅग कॅरी केली होती तसंच चंदेरी पादत्राणं घातली होती या कॅज्युअल लूकमध्ये कियारा चांगलाच भाव खाऊन गेली.

Related Stories

तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणात प्रियकर शिझानला अटक

datta jadhav

सबा आझादची वेबसीरिजकरता निवड

Amit Kulkarni

समांथाचे बॉलिवूड पदार्पण निश्चित

Amit Kulkarni

‘सत्यमेव जयते-2’मधून झळकणार दिव्या

Amit Kulkarni

पाॅर्न प्रकरणातून सुटका करा; राज कुंद्राने न्यायालयाकडे केली मागणी

Archana Banage

शत्रुघ्न सिन्हा… अभिनेता ते राजनेता !

Patil_p
error: Content is protected !!