प्रतिनिधी / बार्शी
विजेची वायर काढण्याच्या कारणावरून मारहाण केल्या प्रकरणी दिगंबर संदीपान काळे रा पानगाव ता बार्शी याच्या विरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की फिर्यादी किसन शिवाजी पाटील हे आज दि. ९ रोजी सकाळी त्यांच्या रस्तापुर रोडवरील शेतातील उडीद काढण्यासाठी गेले असता त्यांच्या शेतातील विहिरी जवळ एक जंगली बेलाचे झाड पसरले असल्याचे दिसून आले तसेच या झाडावरून संदीपान काळे या शेतकऱ्यांची विजेची वायर गेली असल्याचे दिसून आले सदरची वायर काढण्याबाबत संदीपान काळे सांगली असता याचे पुढे वाद वाडत जाऊन ऐकमेकांस हाणामारी झाली. याबाबत तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.


previous post