Tarun Bharat

किरणोत्सारी साधनामुळे चिमोली प्रलय ?

चौकशी सुरू, 31 मृतदेह हाती, 190 हून अधिक बेपत्ता

डेहराडून / वृत्तसंस्था

गेल्या रविवारी उत्तराखंडातील चिमोली येथे हिमकडा कोसळून झालेला प्रलय किरणोत्सारी साधनामुळे असावा असा संशय व्यक्त होत आहे. हे किरणोत्सारी साधन 1965 मध्ये सीआयए आणि आयबी यांच्या एका संयुक्त कारवाईत येथील पर्वत शिखरावर स्थापन करण्यात आले होते. या साधनामुळे उष्णता उत्पन्न होऊन हिमकडा कोसळला असावा, अशी चर्चा आहे. मात्र, याला अधिकृत दुजोरा नाही.

या दुर्घटनेतील 31 मृतदेह आतापर्यंत हाती आले आहेत. अजूनही 190 हून अधिक जण बेपत्ता आहेत. बेपत्ता व्यक्तींच्या नातेवाईकांनी त्यांची जीविताची आशा सोडली असून अंत्यसंस्कार करण्यासाठी तर मृतदेह मिळावा, अशी हताश प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या आपत्ती निवारण यंत्रणा पूर्ण शक्तीनिशी कार्य करीत असून अनेकांना वाचविण्यात यश आले आहे.

साधनामुळे उष्णता वाढल्याने…

1965 मध्ये एका गुप्त कारवाईत एक किरणोत्सारी साधन डोंगरमाथ्यावर स्थापन करण्यात आले होते. त्याचे काम झाल्यानंतर ते काढून टाकण्यात येणार होते. तथापि, हिमवादळामुळे ते नंतर काढून घेणे शक्य झाले नाही. त्यामुळे ते तेथेच राहिले. या साधनामुळे होणाऱया किरणोत्सारामुळे या भागात उष्णता वाढली आणि त्यामुळे हिम वितळून कडा कोसळला असे बोलले जात आहे.

मात्र, याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. या साधनातून आत्ताच एवढा किरणोत्सर्ग कसा झाला आणि इतकी उष्णता कशी वाढली, याचे उत्तर जोपर्यंत मिळत नाही, तो पर्यंत ही शक्यता खरी मानता येत नाही, असे तज्ञांचे मत आहे. तसेच हे साधन इतकी वर्षे कार्यरत राहणे शक्य नाही, असेही अनेक तज्ञांचे मत आहे. पण या प्रकाराची चौकशी सुरू झाली आहे.

शहा यांचे वक्तव्य

या दुर्घटनेवर लोकसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी वक्तव्य केले. त्यांनी दुर्घटनेवर अतीव दुःख व्यक्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी व्यक्तीशः आपत्तीनिवारण कार्यावर लक्ष ठेवत आहेत. पंतप्रधान कार्यालयाने निवारण कार्य करणाऱया दलांशी सातत्याने संपर्क ठेवला आहे. तसेच राज्य सरकारला आवश्यक ते सर्व साहाय्य करण्यात येत आहे, असे शहा यांनी स्पष्ट केले. राज्यसभेतही या घटनेसाठी दुःख व्यक्त करण्यात येऊन मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

बोगद्यात अद्यापही शोधकार्य

तपोवन बोगद्यात अद्यापही भारत-तिबेट सीमा पोलीस, एनडीआरएफ आणि भारतीय सेनेच्या तुकडय़ा शोधकार्य करीत आहेत. या बोगद्यातून आतापर्यंत 21 जणांची सुटका करण्यात आली आहे. मात्र आणखी कामगार अडकले असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे शोधकार्य पेले जात आहे. हा बोगदा साधारणतः 500 मीटर लांब आहे. 200 मीटर लांबीपर्यंत सहज आत जाता येते, अशी माहिती उत्तराखंडचे पोलीस उपप्रमुख अशोक कुमार यांनी दिली.

Related Stories

निकालानंतर भाजप कार्यालयात जाळपोळ

Patil_p

युद्धकालीन चक्रव्यूह रचणार भारत

Patil_p

चंद्रशेखर आझाद यांच्या पक्षाचे नाव निश्चित ?

tarunbharat

शेअर बाजारात 2 हजार अंकांची उसळी

Patil_p

अमरिंदर सिंग यांच्याकडून काँग्रेसचा राजीनामा; नव्या पक्षाचीही घोषणा

datta jadhav

मेघालयात ‘ईव्हीएम’संबंधी बनावट व्हिडिओ व्हायरल

Patil_p