Tarun Bharat

किरण कांदोळकर यांची उत्पल पर्रीकरांशी तासभर चर्चा

Advertisements

प्रतिनिधी /म्हापसा :

थिवीचे माजी आमदार किरण कांदोळकर यांनी उत्पल पर्रीकर यांची पणजीत भेट घेऊन गुरुवारी सायंकाळी त्यांच्यासमवेत सुमारे तासभर चर्चा करून राजकारणाचा आढावा घेतला. नुकतेच माजी आमदार कांदोळकर यांनी हळदोणा पंचायत आपल्याकडे ओढून घेतल्यावर 8 आमदारांचा गट संपर्कात असल्याचे सांगून राज्यात नवीन क्रांती घडवून येणार असल्याचे स्पष्ट केले होते. भाजपला रामराम ठोकण्याचे संकेतही त्यांनी दिल्याने उत्पल बरोबर झालेल्या या बैठकीला वेगळीच राजकीय कलाटणी मिळाली आहे.

श्री. कांदोळकर यांनी सुमारे तासभर उत्पल बरोबर चर्चा करून राजकीय घडामोडीचा आढावा घेतला आहे. शिवाय कांदोळकर यांनी नवीन क्रांतीकारी पक्ष स्थापनेबाबतही चर्चा केली. पक्ष स्थापन करण्याच्या दृष्टीने राजकीय वेगळे पूल उच्ण्ल्याने आता सर्वांचे डोळे त्यांच्या चालीकडे लागले आहे. हळदोणचे माजी उपमुख्यमंत्री तथा सभापती ऍड. दयानंद नार्वेकर यांनी थिवीत कांदोळकर यांचे कार्य उल्लेखनीय असल्याचे सांगून ऐनवेळी गरज भासल्यास मदतीचा हातही पुढे करू असे सांगितल्याने आता कांदोळकरांच्या दृष्टीने राजकारणाला वेगळी कलाटणी मिळाली आहे.

Related Stories

ज्येष्ठ साहित्यिक पु.शि.नार्वेकर निवर्तले

Amit Kulkarni

बायोपिकसाठी सुपरस्टार नव्हे तर चांगल्या कलाकाराची गरज

Amit Kulkarni

दहा हजार परप्रांतीय मजूरांचा परतीचा मार्ग मोकळा

tarunbharat

मगो पक्ष म्हापशात पुन्हा काबिज करण्याचा कार्यकर्त्यांचा निधार

Patil_p

तळर्ण शापोरा नदीत बेकायदेशीर रेती व्यवसाय

Amit Kulkarni

डेंग्यू नियंत्रणासाठी आरोग्य यंत्रणा सतर्क

Amit Kulkarni
error: Content is protected !!