Tarun Bharat

किरण गोसावींच्या आरोपांवर पंच प्रभाकर साईलने दिले उत्तर

Advertisements

मुंबई/प्रतिनिधी

आर्यन खानच्या (Aryan Khan) ड्रग्ज प्रकरणाला (Drugs case) रोज नवे वळण लागताना दिसत आहे. या प्रकरणातील साक्षीदार किरण गोसावी हा फरार आहे. त्याने आता पोलिसांसमोर आत्मसमर्पण करण्याची तयारी दर्शवली आहे. सोमवारी किरण गोसावी याने ३० मिनिटांत पोलिसांसमोर आत्मसमर्पण करणार असल्याचा दावा केला होता. किरण गोसावी (kiran gosavi) यांच्यावर बॉडीगार्ड प्रभाकर साईलाचा (punch prabhakar sail) आरोप आहे की गोसावी आणि सॅम यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांना २५ कोटी रुपये देण्याचे सांगितले होते. त्या आरोपावरही गोसावीने प्रत्युत्तर दिले होते.

गोसावीने मी अर्ध्या तासात महाराष्ट्राबाहेर आत्मसमर्पण करत आहे. सर्व काही स्पष्ट होईल असे म्हटले होते. त्याचवेळी प्रभाकर साईलने केलेल्या आरोपावर गोसावीने, सर्व आरोप खोटे असून पोलीस आणि एनसीबीने याची चौकशी करावी आणि सत्य बाहेर यावे, अशी माझी इच्छा आहे. प्रभाकरचे नेत्यासोबत संबंध असल्याने तो असे आरोप करत आहे, असे म्हटले होते. त्यावर आता पंच प्रभाकर साईलने पत्रकार परिषद घेत किरण गोसावीने केलेल्या आरोपांवर उत्तर दिले आहे.

“नेत्यांसोबत माझे संबंध कसे असू शकतात? मी सत्य बाहेर आणण्याचा प्रयत्न करत आहे. माझ्यावर एकही गुन्हा दाखल नाही. माझे नेत्यांसोबत असण्याचा प्रश्न कुठून आला. मी जे काही उघडकीस आणतो आहे त्यामुळे मला बदनाम करण्याचा डाव सुरु आहे. त्यांना आत्मसमर्पण करु द्या मग मी माझ्याकडे आणखी काहीतरी आहे ते तुम्हाला सांगेन,” असे प्रभाकर साईन यांनी म्हटले आहे.

Related Stories

संपर्क टाळण्यासाठी जिल्हा रुग्णालयात रोबो

Patil_p

मी मोदींचे दु:ख जवळून पाहिले, आज सत्य सोन्यासारखे बाहेर आले – अमित शाह

Archana Banage

मुस्लिम बांधवांनो रमजानच्या काळात नमाज घरातच अदा करा

Archana Banage

अँड.पंडितराव सडोलीकर यांचे निधन

Archana Banage

गुणरत्न सदावर्तेंना दोन दिवसांची पोलीस कोठडी

Archana Banage

चारधाम यात्रा पुढील आदेशापर्यंत स्थगित : उत्तराखंड सरकार

Tousif Mujawar
error: Content is protected !!