Tarun Bharat

किरण ठाकुर यांचे 71 व्या वर्षात पदार्पण

हिंडलगा येथील तरुण भारत कॉर्पोरेट कार्यालयाचे आज उद्घाटन : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची उपस्थिती

प्रतिनिधी /बेळगाव

पत्रकारिता, शिक्षण, समाजकारण, अर्थकारण अशा विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाची मोहोर उमटविलेले, ‘तरुण भारत’ या शतकपूर्ती दैनिकाचे समूहप्रमुख व सल्लागार संपादक तसेच लोकमान्य सोसायटीचे चेअरमन किरण ठाकुर आज 71 व्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्यांचे अभीष्टचिंतन करण्यासाठी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे आज बेळगावला येत आहेत. त्यांच्याच हस्ते तरुण भारतच्या हिंडलगा येथील कॉर्पोरेट कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे.

यानिमित्त लोकमान्य सोसायटीतर्फे गणाधीश लॉन हिंडलगा येथे सकाळी 11 वाजता कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला आहे. गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर प्रमोद सावंत बेळगावला येत आहेत. त्यांची ही भेट विशेष ठरणार आहे.

किरण ठाकुर यांनी सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रात भरीव काम केले आहे. विज्ञान शाखेचे पदवीधर असले तरी पत्रकारिता हा त्यांचा पिंड आहे. 1968 पासून तरुण भारतमध्ये क्रीडा पत्रकार म्हणून ते रुजू झाले तर 1979 मध्ये त्यांनी तरुण भारतचे संपादक म्हणून सूत्रे स्वीकारली आणि अल्पावधीतच तरुण भारतच्या विविध आवृत्त्या सुरू केल्या. इंटरनेटवर जाणारे पहिले वृत्तपत्र म्हणजे तरुण भारतच होय. संपादक पदाची धुरा सांभाळतानाच 1995 मध्ये त्यांनी लोकमान्य सोसायटीची स्थापना केली आणि 2002 मध्ये लोकमान्यला मल्टिस्टेट म्हणून मान्यता मिळाली. केवळ बेळगावच नव्हे तर गोवा, कोकण, महाराष्ट्रामधील विविध साहित्यिक, सांस्कृतिक आणि सामाजिक संस्थांशी त्यांचे घनिष्ट संबंध आहेत.

Related Stories

सांगे मतदारसंघात अटीतटीच्या लढतीची चिन्हे

Patil_p

चोवीस तासात कोरोनाचे 2 बळी

Amit Kulkarni

धर्मवीर बलिदान मासला गुरुवारपासून प्रारंभ

Amit Kulkarni

अमलीपदार्थ बाळगल्याच्या आरोपातून 7 जण निर्दोष

Omkar B

शैक्षणिक क्षेत्रातील नवा पूल म्हणजे ’मांडवी’

Amit Kulkarni

यल्लम्मा मंदिर दीपोत्सवाने उजळले

Omkar B