Tarun Bharat

किरण ठाकुर-सहकार क्षेत्रातील राष्ट्रप्रेमी व्यक्तिमत्त्व

प्रतिनिधी / बेळगाव

माणसाचं माणूसपण त्यांचे कर्म, व्यक्तिमत्त्व आणि दृष्टिकोनातून प्रतिबिंबीत होत असते. कर्म, व्यक्तिमत्त्व व दृष्टिकोनाचा विकास हा संस्कार व सत्संगातून होत असतो. जर बालपणापासून संस्कार राष्ट्रभक्तीचा, समाजकारणाचा, नेतृत्वगुणाचा आणि प्रामाणिकपणाचा असेल तर ते व्यक्तिमत्त्व अधिक ठसठशीतपणे पुढे येते. अशा ‘लोकमान्य’ व्यक्तिमत्त्वांपैकीच एक म्हणजे लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष श्री. किरण ठाकुर.

आज 7 एप्रिल किरण ठाकुर यांचा वाढदिवस. त्यांनी आज वयाची 68 वर्षे पूर्ण केली. आतापर्यंतच्या यशस्वी प्रवासासाठी त्यांचे मनःपूर्वक अभीष्टचिंतन व पुढील यशस्वी-आरोग्यदायी वाटचालीसाठी शुभेच्छा.

किरण ठाकुर यांच्या आजवरच्या यशस्वी प्रवासाला सर्वार्थाने पाठबळ मिळाले आहे ते त्यांचे वडील दैनिक तरुण भारतचे संस्थापक संपादक व स्वातंत्र्यसेनानी कै. बाबुराव ठाकुर व आई स्नेहलता ठाकुर (माई) यांचे संस्कार व आशीर्वादाचे… वडिलांच्या स्वातंत्र्यलढय़ातील समर्पित त्याग व आई-वडिलांनी केलेले संस्कार या मोठय़ा संपत्तीचेच ते धनी आहेत.

 तरुण भारतचा शतकाहून अधिक काळापासून असलेला निःपक्ष पत्रकारितेचा, वैभवशाली परंपरेचा वारसा त्यांनी 1979 पासून जपला व संवर्धित केला आहे. मातृभाषेचे, मराठी अस्मितेचे प्रेम उराशी बाळगून त्यांचा हा प्रवास महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील बेळगावातून सुरू झाला. महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात विश्वासाच्या बळावर आर्थिक क्षेत्रातील संस्थेचे जाळे विणण्यासोबतच, एकमेकांना साहाय्य करू असा संदेश देत विशेषतः तरुणांना रोजगार मिळावा या उद्देशाने किरण ठाकुर यांनी 15 ऑगस्ट 1995 ला लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीची मुहूर्तमेढ रोवली. सोसायटीचे 213 शाखा व 5 हजार 500 कोटी रुपयांपेक्षा अधिक ठेवींसह आज वटवृक्षात रुपांतर झाले आहे. अनेक युवक व युवतींना प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे रोजगार मिळाला आहे.

पारदर्शक व विश्वासार्ह अर्थसेवेच्या माध्यमातून मिळविलेला लोकांचा विश्वास हा सातत्याने लोककल्याणाच्या कामी कसा येईल, हे किरण ठाकुर यांचे सूत्र लोकमान्य सोसायटीने आजतागायत जपले आणि अंगीकारले. लोकमान्य सोसायटीची हीच खरी ओळख बनली आहे.

आजवरच्या आपल्या प्रवासात किरण ठाकुर यांनी समाज जीवनाच्या सर्वच क्षेत्रात आपल्या वेगळय़ा कामगिरीचा ठसा उमटविला आहे. मग ते क्षेत्र निःपक्ष पत्रकारितेचे असेल, लोकमान्य सोसायटीच्या रूपाने वित्तीय क्षेत्राचे असेल, अस्मितेच्या प्रश्नावरून सीमावर्ती भागातील असेल वा शिक्षण, आरोग्य, रोजगार, महिला व बालकल्याण, ग्रामविकास, ज्ये÷ नागरिक, पर्यावरण या क्षेत्रात असेल. या साऱया क्षेत्रांमध्ये, विषयांमध्ये मुलभूत व दूरगामी काम उभे करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.

याशिवाय विश्वास, प्रामाणिकपणा, पारदर्शक व सचोटीपूर्ण व्यवहाराच्या मदतीने किरण ठाकुर यांच्या नेतृत्वात आज देखील भविष्यवेधक व धोरणी उद्योजकतेची  छाप उमटविली आहे. पत्रकारिता, उद्योजकता, शिक्षण क्षेत्रातील अनेक प्रति÷sच्या पुरस्कारांनी त्यांच्या या कार्यकर्तृत्वाचा यथोचित सन्मान केला आहे. ज्यामध्ये आचार्य अत्रे पुरस्कार, ना. भि. परुळेकर पुरस्कार, छत्रपती शाहू पुरस्कार, जागतिक मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्सचा पुरस्कार आदी पुरस्कारांचा प्राधान्याने उल्लेख करता येईल. सहकार संस्कृती संरक्षित, संवर्धित झाली पाहिजे, हे करताना राष्ट्रीयत्वाची भावना जपली पाहिजे. त्यांचे हे तत्त्व लोकमान्य समूहासाठी पाऊलवाट बनली आहे. किरण ठाकुर यांच्या भविष्यवेधक दृष्टिकोनासह सक्षम नेतृत्व पुढील प्रवासासाठी आम्ही सारेजण कटिबद्ध आहोत.

Related Stories

कर्नाटकात सलग दुसऱ्या दिवशीही पाच हजाराहून अधिक नवीन रुग्ण

Archana Banage

दोन दिवसांत 647 जण झाले कोरोनामुक्त

Patil_p

यरमाळ रोडवरील वड्डर छावणीकडे मनपाचे दुर्लक्ष

Amit Kulkarni

शहराचा उत्तर भागासाठी अग्निशमन केंद्र गरजेचे

Amit Kulkarni

शरद पवार यांच्या घरावर हल्ला करणाऱयांना अटक करा

Amit Kulkarni

शंभर ग्रॅमच्या गांजाने भरली बसनगौडाची शंभरी!

Amit Kulkarni
error: Content is protected !!