Tarun Bharat

किरपेत बिबट्या जेरबंद

Advertisements

कराड / प्रतिनिधी : 

कराड तालुक्यातील किरपे येथे आज (दि. 26)  पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास बिबट्या पिंजऱ्यात सापडला. ग्रामस्थांना कोणत्याही प्रकारची माहिती न होता, वनविभागाने हा बिबट्या किरपे गावातून अन्य ठिकाणी नेला आहे. 

कराड तालुक्यातील येणके येथे बिबट्या दोन महिन्यांपूर्वी पिंजऱ्यात अडकला होता. त्यानंतर आज 26 जानेवारी रोजी दुसरा बिबट्या पिंजऱ्यात अडकला. मात्र, किरपे, येणके, सुपने, तांबवे या भागात बिबट्याचे प्रमाण अजून असल्याने वनविभागाने त्या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांच्यातून करण्यात येत आहे. 

किरपे येथील मौवटी शिवारात नारायण मंदिराजवळ हा बिबट्या पिंजऱ्यात अडकला. यावेळी विद्याधर देवकर, आनंदा देवकर, पोलीस पाटील प्रविण तिकवडे यांना बिबट्या पिंजऱ्यात कैद झाल्याचे वनविभागाने दाखविले. तसेच तेथून तात्काळ बिबट्या अन्य ठिकाणी वैद्यकीय तपासणीसाठी हलविण्यात आला आहे.

Related Stories

सातारा शहरात आकर्षक विक्रीला मखर

Patil_p

दारुच्या नशेत सख्या भावाचा खून

Patil_p

मंत्री उदय सामंत यांचा निर्णयांचा धडाका

Patil_p

सातारा : वाळूच्या कारणातून नरवणेत दोघांचा निर्घृण खून

datta jadhav

सातारा, कोल्हापूर येथील 167 बंदीवानांना तात्पुरता जामीन मंजूर

Patil_p

खा. उदयनराजेंनी ओपन गाडीतून मारली रपेट

datta jadhav
error: Content is protected !!