Tarun Bharat

किराणा दुकानाला आग; 15 लाखांचे नुकसान

Advertisements

प्रतिनिधी/ सातारा

कोरेगाव तालुक्यातील धामणेर येथील रेल्वेस्टेशनच्या नजीक असलेल्या कृष्णाजी निंबाळकर यांच्या किराणा मालाच्या दुकानाला शुक्रवारी रात्री 12 च्या सुमारास आग लागली. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असून आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

दुकानात दिवाळी सणासाठी खरेदी केलेला किराणा माल, फर्निचर, मौल्यवान वस्तू, कागदपत्रे असे 15 लाख रुपयांच्या साहित्यांचे नुकसान झाले आहे. आगीमुळे मोठय़ा प्रमाणावर धूराचे लोट परिसरात निर्माण झाले होते.

अचानक आग लागल्याने हा प्रकार स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आला. अग्निग्नशमन दलाला माहिती कळवताच अग्निग्नशमन दल आणि पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. अग्निग्नशामक दलाकडून आग आटोक्यात आणली असून ऐन दिवाळीच्या तोंडावर किराणा दुकानाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

Related Stories

सरकारने मराठा समाजासोबतच ओबीसी समाजाचा विश्‍वासघात केला

Abhijeet Shinde

कोल्हापूर : जयसिंगपूरच्या नगराध्यक्षा कोरोना पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde

आधी बुकिंग, मगच तिरुपती दर्शन

Abhijeet Shinde

सातारा : बायोवेस्ट सोनगाव कचरा डेपोत; नेचर निडकडे जाणाऱ्या रस्त्यावर पडलाय कचरा

Abhijeet Shinde

काँग्रेस प्रदेश कार्याध्यक्षपदी आमदार प्रणिती शिंदे

Abhijeet Shinde

महाराष्ट्रात पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज; रत्नागिरी, रायगडला ऑरेंज अलर्ट

Rohan_P
error: Content is protected !!