Tarun Bharat

किराणा दुकाने सकाळी 7 ते 11 अशी सुरु ठेवण्याचा विचार – राजेश टोपे

मुंबई / ऑनलाईन टीम

कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता राज्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. तरी देखील कोरोना रुग्णसंख्या वाढतच आहे. त्यामुळेच किराणा दुकानांची वेळ सकाळी 7 ते 11 करण्याचा विचार राज्य सरकार करत आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री यांनी दिली आहे.

राजेश टोपे माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, येत्या 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊनमध्ये आणखी कडक निर्बंध केले पाहिजेत. राज्यात कडक निर्बंध लागू केलेले असतानाही अनेक लोक विनाकारण बाहेर रस्त्यावर फिरणाताना दिसत आहेत. त्यांना आळा घालण्यात यासाठी किराणा दुकाने 7 ते 11 या दरम्यान सुरु ठेवण्याबाबतची चर्चा झाली आहे. जिल्हास्तरावर याबाबत निर्णय घेतले जावे याबाबतही चर्चा झाली, असं राजेश टोपे यांनी म्हटलं. दुर्गम भागातील जिल्ह्यात जेथील कलेक्टरचा संबंध रोज मंत्रालयाशी होत नाही. तिथे पालक सचिवांनी अधिक अॅक्टिव्हली काम केलं पाहिजे. त्यांनी आपापल्या जिल्ह्यात कोरोनावर नियंत्रण ठेवावं, अशीही चर्चा झाली. निर्बंध अधिक कडक करण्यासाठी पोलिसांना सूचना दिल्या आहेत. ब्रेक द चेन साधायचे असेल तर यापुढे गरज पडेल तसं आणखी गोष्टी कडक केल्या जातील, असं त्यांनी म्हटलं.

ऑक्सिजन हा महत्त्वाचा विषय आहे. आपण स्वत:चं साडेबाराशे मेट्रिक टन ऑक्सिजन वापरत आहोत. पण त्याचबरोबर 300 मेट्रिक टन आपण बाहेरुन भिलाई, बिल्लारी आणि विशापट्टणम येथून आणतोय. त्यामुळे 1550 टन ऑक्सिजन दररोज महाराष्ट्रात आहे. येत्या 20 तारखेपर्यंत ऑक्सिजन कोट्यापर्यंत सांगितलं आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली तर आणखी ऑक्सिजनची गरज लागेल. पुढे आपण ऑक्सिजन निर्माण करणाऱ्या तंत्रज्ञानाचा वापर करुन कलेक्टरने त्वरित निर्णय घ्यावा, असे देखील राजेश टोपे म्हणाले.

Related Stories

अनिल देशमुख यांच्यावरिल आरोप खोटे असल्याचा चांदीवाल आयोगाचा निर्वाळा

Archana Banage

कोरोनाच्या शिरकावामुळे भारत-इंग्लंड कसोटी रद्द

datta jadhav

बेंगळूर येथे झालेल्या भीषण अपघातात आमदारांचा मुलगा-सुनेसह सात ठार

Archana Banage

मदीरेचे दार उडले, पण मंदिराचे बंदच.

Patil_p

हरयाणात 30 जून पर्यंत च्युईंगम विक्रीवर बंदी 

prashant_c

उच्चस्तरीय केंद्रीय पथकाने घेतला बारामती तालुक्याचा आढावा

datta jadhav