Tarun Bharat

किरीट सोमय्या जाणार बुधवारी जरंडेश्वरवर

प्रतिनिधी/ सातारा

सध्या जिह्यातील साखर कारखान्यावरून चांगलेच राजकिय रान पेटले आहे. जरंडेश्वर कारखान्याबाबतच्या तक्रारी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्याकडे झाल्या आहेत. त्या अनुषंगाने ते सातारा जिल्हा दौयावर दि.6रोजी येत आहेत. ते जरंडेश्वर कारखान्यावर भेट देणार असून त्यांच्या भेटीमुळे   कोरेगावसह जिह्यातील पोलीस यंत्रणा अलर्ट झाली आहे. दरम्यान, भुईंजच्या किसन वीर कारखान्याच्या अनुषंगाने नितीन पाटील हे त्यांची भेट घेणार का?,अशी उत्सुकता लागून राहिली आहे.

जिह्यातील काही साखर कारखाने हे सरकारच्या रेड झोनमध्ये आहेत. चालू गळीत हंगाम सुरू होईल की नाही याची भीती ही व्यक्त होत आहे. काही कारखान्यानी एफआरपी दिलेली नाही. दरम्यान, असे असताना जरंडेश्वर कारखान्या संदर्भात भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडे तक्रारी झाल्या होत्या. त्या तक्रारीच्या अनुषंगाने सोमय्या हे दि.6रोजी जिह्याच्या दौयावर येत आहेत. ते रात्री सव्वा तीन वाजता रेल्वेने सातायात येणार आणि शासकीय विश्रामगृह येथे आराम करणार आहेत.सकाळी पावणे दहा वाजता संगमगर येथील भीमराव लोखंडे यांच्या घरी नाष्टा करून कोरेगाव येथील आझाद चौकात त्यांचे स्वागत होणार आहे. तेथून जरंडेश्वर कारखाना येथे भेट देणार आहेत.तेथे पाहणी करणार आहेत. शेतकयांशी सवांद साधणार आहेत. पुढे ते पुसेगाव, फलटण असे जाणार आहेत. त्यांच्या दौयाच्या अनुषंगाने कडक बंदोबस्त ठेवण्यात  येणार आहे. दरम्यान, भुईंजच्या किसन वीर कारखान्याच्या अनुषंगाने नितीन पाटील हे त्यांची भेट घेणार का अशी चर्चा सुरू आहे.

Related Stories

राज्यातील पहिला विवो स्मार्ट फोन स्टोर साताऱयात

Patil_p

सातारा : पती-पत्नीचे भांडण सोडवायला गेलेल्या हवालदारास मारहाण

datta jadhav

टॉप कॉलम धुळे मारहाण प्रकरणाचा साताऱयात निषेध

Patil_p

भाजपाच्या नगरसेवकाने उभे राहून खड्डे बुजवून घेतले

Amit Kulkarni

पालिकेच्या लेट लतिफांची धरपकड

Patil_p

अन पालिकेने स्वच्छ केली ती कचराकुंडी

Omkar B