Tarun Bharat

किरीट सोमय्या यांच्याकडून कुडाळ बस स्थानकाच्या इमारतीची पाहणी

अनिल परब यांच्या कारकिर्दीत झालेल्या कामाची केली पाहणी

कुडाळ / प्रतिनिधी-

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटके मागील सूत्रधार परिवहन मंत्री परब अनिल परब असल्याचा आरोप भाजपाने या पूर्वीच केला आहे. भाजपा एवढ्यावरच थांबले नसून अनिल परब यांच्या मंत्रिपदाच्या कारकिर्दीत झालेल्या कामाची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी भाजपा नेते किरीट सोमय्या व आमदार नितेश राणे यांनी कुडाळ एसटी बस स्थानकाच्या इमारतीची धावती पाहणी केली.

अनिल परब यांच्या विरोधात पुरावे गोळा करण्याचे काम किरीट सोमय्या व नितेश राणे यांनी सुरू केले आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या व केद्रिय मंत्री नारायण राणे यांनी आनिल परब यांच्या वर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. शुक्रवारी सकाळी सोमय्या व राणे यांनी कुडाळ स्थानकावर भेट देत माहिती घेतली. जि. प.चे माजी उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी बस स्थानकाच्या इमारत बांधकाम व बांधकामाच्या कामाबाबत नाराजी व्यक्त केली. अडीज कोटी खर्च करुन एक वर्ष झाले नाही तरीही संपूर्ण गळती असल्याचा आरोप राकेश कांदे व निलेश तेडूलकर यांनी केला. प्रवाशांसाठी निवारा शेड नसल्याचेही त्यांनी सांगितले. यावर सोमय्या यांनी आपण पत्रकार परीषदेत बोलू आसे सांगितले.

यावेळी भाजपा नेते राजू राऊळ.. जिल्हा महिला आघाडी प्रमुख संध्या तेरसे, निलेश तेडूलकर, विनायक राणे, गजानन वेगुर्लेकर, सुनिल बांदेकर, विजय कांबळी, साक्षी सावंत, राकेश कांदे, अनंत धडाम व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Stories

बनावट दागिने ठेवून बँकेची ५ लाखांची फसवणूक

NIKHIL_N

नियोजनच्या रकमेत रुपयाचीही कपात नाही

NIKHIL_N

विमानतळाच्या सुविधा उपलब्धतेसाठी कुणी हात बांधले?

NIKHIL_N

चिमुकल्या हातांनी साकारला लक्षवेधी किल्ला

Anuja Kudatarkar

जिल्हा परिषदेच्या पदभरती परीक्षा वेळापत्रकात बदल

NIKHIL_N

जिल्हय़ात सीआरझेडची मर्यादा 100 वरून 50 मीटरवर!

Patil_p